संपादकीय :सहदेव जाधव
राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात हे प्रकरण गाजत आहेत. भोंदूबाबा अशोक खरात यांचे थेट संबंध राजकीय नेत्यांशी असल्यामुळे हे प्रकरण ज्यास्तच चवीने चघलळे जात आहेत. परंतू अशोक खरात सारखे अनेक महाठग भोंदू सध्या तयार झाले आहेत. हा प्रकार कालपर्यंत खेडेपाड्यात दिसून येत होता परंतु आता यात शहरी भागातील लोक ही जादूटोण्या चे बळी पडत असल्याचे दिसत आहे. अशिक्षित वर्ग बुवाबाजी, गंडेदोरे, अंगारा धुपरा या माध्यमातून भोंदूगिरीला खतपाणी घालत होता परंतू आता उच्च शिक्षित लोक देखील या भोंदूवर विश्वास ठेवायला लागले हे मात्र आता नवलच झालंय.
महाराष्ट्रात सध्या भोंदूगिरीला ऊत आला आहे. खुलेआम भोंदू बाबांनी आपले दुकान थाटल्याचे दिसून येतंय.. आपल्या स्वतःच्या youtube, facebook, instagram या सारख्या सोशल मीडिया च्या माध्यमातून आपल्या चमत्काराचे व्हिडीओ टाकून भोळ्या भाबड्या जनतेला फसवले जात आहे. यात या भोंदूना क्वचितशी ही भय वाटत नाही. प्रशासन या सर्व भोंदूची माहिती असून देखील सोईस्कर दुर्लक्ष्य करताना दिसत आहे. सध्या भोंदू बाबांचे विविध प्रकार समोर येत आहे. जनतेच्या धार्मिकतेच्या भावनांचा गैरफायदा घेऊन आपली दुकानें भोंदूनी थाटली आहे. याला काही प्रशासकीय अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे.

हिंदू देव देवताना बदनाम करण्याचे षडयंत्र
खरेतर धार्मिक मुद्द्याला हत्यार बनवत ही भोंदू मंडळी आपली दुकानदारी मांडत आहे. या माध्यमातून हिंदू धर्माची बदनामी हे भोंदू करत आहेत. राज्यभरातून असे अनेक प्रकार दिवसेंदिवस समोर येऊ लागले आहेत. भोंदूबाबा आपल्याकडे येणाऱ्या पीडिताना काही चमत्कार दाखवून आपल्याकडे आकर्षित करतो. आणि विश्वास बसला की त्याच पीडित व्यक्तीची मोठी फसवणूक करत आहेत. करणी, काळाजादू, या माध्यमातून आलेल्या व्यक्ती सोबत अघोरीं कृत्य हे भोंदू करत आहेत. अमावस्या पौर्णिमा या दिवशीं हे कृत्य सर्रास या सैतानकडून सुरु आहे.
भोंदूंगिरीला कायदेशीर आधार मिळवण्याचा प्रयत्न
अनेक भोंदूनी आपल्या या भोंदूगिरीला कायदेशीर आधार मिळवण्यासाठी धर्मदाय आयुक्तांच्या माध्यमातून ट्रस्ट स्थापन केले आहेत. या काही ट्रस्ट च्या नावाखाली वाम मार्गाने येणारी देणगी, वाममार्गाने आलेला पैसा, बळकवलेल्या जमिनी, शासकीय जमिनीवर घेतलेला अनधिकृत ताबा या सर्व गोष्टी घडलेल्या दिसून येत आहे. यावर मात्र प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने या भोंदूचें फोफावत चालले आहेत. अनेक भोंदूच्या ट्रस्ट ला शासनाने पर्यटन विकास च्या नावाखाली निधी दिल्याचे खुलासे तसेच पुरावे हाती आले आहेत. म्हणूनच हे सिद्ध होते की या भोंदूना राजश्रय मिळतोय. आणि याच कारणाने स्थानिक प्रशासन देखील अशा भोंदूंकडे कारवाई करताना दुर्लक्ष करते.

अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातही भोंदूबाबांना फुटले पेव
संगमनेर शहरातील हाकेच्या अंतरावर असलेल्या वडगाव पान येथे देखील एका भोंदूबाबाचे अघोरीं कृत्य काही दिवसांपूर्वी समोर आले होते. अनेकांच्या करणी, काळीजादू काढण्यासाठी अघोरीं कृत्य केल्याची उदाहरणं घडली आहेत. दर गुरुवारी या ठिकाणी या बाबाचा मोठा दरबार भरला जातो. मानसिक आजारी असलेल्या व्यक्तींना बरे करण्याचा दावा हा बाबा करत असतो. एका वृद्ध दाम्पत्याला देखील फसवल्याचा आरोप या भोंदूवर आहे. वडगाव पान येथे या बाबाने आपल्या भोंदूगिरी चे मोठे दुकान थाटले आहे. मोठं मोठे पुढारी देखील या बाबाचे भक्त असल्याची माहिती देखील एका स्थानिकाने नाव न सांगण्याच्या बोलीवर आम्हाला दिली आहे. अनेक अघोरीं कृत्य याठिकाणी घडत आहेत. परंतू प्रशासन याकडे सोईस्कर दुर्लक्ष्य का करत आहेत

संगमनेर तालुक्यातील पठार भागात देखील भोंदूगिरीची दुकानदारी जोमात
संगमनेर तालुक्यात देखील अनेक भोंदूनी आपली दुकानदारी सुरु केली आहे. कौटुंबिक कलह, दुर्धर आजार, महिलांचे शारीरिक आजार, अपत्य प्राप्ती याने पीडित असलेले महिला पुरुष या भोंदूच्या सानिध्यात जातात. आणि त्यांच्याकडून सुख प्राप्तीची भाबडी आशा बाळगतात. याचाच गैर फायदा हे भोंदू घेताना दिसत आहेत. मध्यंतरी एका भोंदू बाबाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पठार भागात सोशल मीडिया वर व्हायरल होत होता. हा भोंदूबाबा एका महिलेसह रात्रीच्या सुमारास काही तरुणांनी आक्षेपार्ह अवस्थेत पकडला होता. या तरुणांनी या बाबाला अशा अवस्थेत पकडल्यामुळे बाबाला चांगलाच चोप दिला. हा चोप दिल्याचा व्हिडीओ सोशल माध्यमात काही दिवस मोठ्या प्रमाणात फिरत होता. या व्यक्ती वर देखील मोठ्या प्रमाणात महिलांच्या शोषणाचा आरोप केला जात आहे. तसेच या जादूटोण्याच्या माध्यमातून या भोंदूनें पठार भागात मोठं प्रस्त उभे केले आहे.
हिंदू देवदेवताना बदनाम करू नका
अनेक भोंदू हे हिंदू देवदेवता साक्ष ठेऊन हा गोरख धंदा करत आहेत. अनेकांनी ट्रस्ट निर्माण करून मोठे मंदिरे उभी केली आहेत. अशाच एका ठगाने मंदिराच्या नावाखाली पठार भागात शासकीय जागेवरच अतिक्रमण केले आहे. येथे मोठ्या प्रमाणात म्हणजेच 44 एकर शासकीय जागेवर अतिक्रमण केले आहे. गावाच्या विकासाच्या नावावर पर्यटन विभागाचा निधी आणून खोटे दस्तऐवज बनवून स्वतःच्या घशात घातला आहे. यांचे आपण रीतसर वृत्त काही दिवसांपूर्वी दाखवले होते परंतू येथे काही मोठ्या राजकीय व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे कुठलीही कारवाई झाली नाही.
धर्माच्या नावाखाली अनेक जण आपला प्रपंच थाटत आहेत खऱ्या अर्थाने याला अंकुश लावणे प्रशासनाचे काम आहे. पण येथे ‘कुंपणच शेत खातयं, न्याय कुणाकडे मागणार’ … त्यातच अधिकाऱ्यांची मनस्थिती देखील अशी बनलीय, ‘ये रे माझ्या मागल्या, ताक कण्या चांगल्या’! कुणीही यावर बोलण्यास तयार नाही. लोकप्रतिनिधी यांच्याकडील मतदान मिळवण्यासाठी लाचार तर अधिकारी अर्थप्राप्ती साठी लाचार. त्यामुळे आता सध्या तरी ‘झाकली मूठ सव्वा लाखाची.’






