बेजबाबदार वाहनचालकांना लगाम लावा.. वाहतुकीचे नियम पाळा
साकूर येथील स्कुटी आणि पिक अप ची झालेली धडक..! अपघातात मयत झालेल्या तरुणाला न्याय कोण देणार..? सत्य लपवण्यासाठी पिक अप मालकाचा आटापिटा..! पोलीस ठाण्यात वेगळेच वाहन आणून लावले, घारगाव पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी खाकी दाखवताच खरे वाहन आणून लावले…

पिक अप मालकाच्या हलगर्जी पणामुळे आज एका तरुणाचा मृत्यू झालाय त्याचा संसार उघड्यावर पडलाय.. त्याचे कुटुंब अनाथ झालंय. पिक अप वाहनाच्या मालकाच्या निष्काळजी पणा एकाच्या जीवावर बेतला गेलाय.. हा एक अपघात नसून हा तर सदोष मनुष्यवध आहे. आज या वाहनावर, वाहनमालकावर योग्य गुन्हा नोंदला गेला नाहीतर या निष्काळजी लोकांना चाप बसणार नाही. त्यामुळे प्रशासनाने देखील माणुसकी जिवंत ठेवून मृत आत्म्यास न्याय द्यावा.. व अपघातातील सत्य वाहन व सत्य चालक यांना ताब्यात घ्यावे.. व या अशा निष्काळजी लोकांना सबक शिकवावी अशी मागणी अपघात बघणाऱ्यानी केली आहे.
अपघात झाल्यानंतर सदर मृतदेह जागेवरच पडलेला होता. परंतू साकूर मध्ये काही दिवसांपासून देवदूत ठरलेले डॉ. पवन खेमनर यांनी तातडीने आपल्या हॉस्पिटल ची रुग्णवाहीका तात्काळ तेथे पाठवली परंतू दुर्दैवी ठरलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघाताची माहिती आपण आधीही सांगितली परंतू पुन्हा सविस्तर सांगूयात संगमनेर तालुक्यातील साकूर येथे काही दिवसांपूर्वी स्कुटी व पिक अप या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात स्कुटी चालकाचा दुर्दैवी अंत झाला. स्कुटी चालक प्रताप विजय माने हे श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर शेळकेवाडी येथील रहिवाशी होते. आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी ते राजापूर शेळकेवाडी येथून ते साकूर मार्गे नाशिक चाललेले होते. परंतू भरधाव असलेल्या पिक अप ने साकूर चौफुली च्या पुढे एसार पेट्रोल पंपासमोर जोराची धडक दिली. ही धडक एवढी मोठी होती की, प्रताप माने हे जागीच ठार झाले.
पिकअप चालक हा अल्पवयीन असल्याचे माहिती मिळाली आहे याची आम्ही पुष्ठी करत नाही पण पोलिसांनी याबाबत देखील तपास करून कारवाई करावी, पिक अप चे कागदपत्रे पूर्ण नसल्याने. पिक अप चालक पसार झाला. परंतू या अगोदर राजसत्ता न्यूजने केलेल्या बातमीमुळे अपघात वाहन बदलणे या पिकअप मालकाला जमले नाही. पोलिसांनी थेट घारगाव पोलीस ठाण्यात आणलेले वाहन मागे पाठवून खरे अपघात झालेले वाहन जमा करण्यास खडसावून सांगितले. यानंतर मात्र पिक अप मालकाने अपघात झालेली पिक अप पुन्हा पोलीस ठाण्यात आणून लावली.

माणुसकी हरपली
अपघात झाल्यानंतर जखमी तरुणाची विचारपूस करून त्यास तात्काळ रुग्णालयात हलवणे गरजेचे होते परंतू पिक अप चालकाने घाबरून तेथून पळ काढला. चालकाच्या बापाने देखील नामी शक्कल लढवत थेट दुसरे वाहन पोलीस ठाण्यात नेऊन चालक देखील बदलण्याचा प्रयत्न केला असे बोलले जातंय. पैस्याच्या जोरावर एक मृत्यू तुम्ही दडपण्याचा प्रयत्न करता हे अतिशय दुर्दैवी प्रकार आहे. प्रशासनाने पिकअप चालक व मालक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणं गरजेचे आहे. बघुयात आता पोलीस प्रशासन काय दाखल करतात ते.






