साकूर पठार भागात वाळू तस्करांचा हैदोस, महसूल प्रशासनाकडे राजसत्ता न्यूज चा पाठ पुरावा परंतू महसूलचे कारवाई कडे दुर्लक्ष्य, ‘रात्रीस खेळ चाले’ अशी परिस्थिती, राजकीय वरदहस्ता मुळे वाळू तस्करांची मुजोरी वाढली थेट तक्रारकर्ते सहदेव जाधव यांना जीवे मारण्याची धमकी.
संगमनेर तालुक्यातील पठार भागात मुळा नदी वरून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत आहे. मुळा नदी ही पारनेर तालुका व संगमनेर तालुका सीमेवरून वाहते. वाळू तस्कर याचाच फायदा घेऊन वाळू चोरी करत आहेत. संगमनेर हद्दीतील जांबुत, खैरदरा, साकूर, मांडवे, शिंदोडी तर पारनेर तालुक्यातील टेकडवाडी, देसवडे, बोरमळा, मांडवे खुर्द, नागापूर, तास या गावातून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरु आहे. या वाळू तस्करी चे व्हिडीओ तहसीलदार पारनेर यांना पाठवले. परंतू पारनेर चे तहसीलदार यांनी कुठलीही कारवाई न करता उलट वाळू तस्कर यांना तक्रारदार यांचा नंबर देऊन धमकावण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे वाळू तस्करांचे कनेक्शन थेट महसूल अधिकाऱ्यांशी असल्याचे सिद्ध झाले आहे.

वाळू तस्करांनी तक्रारदार यांना थेट आर्थिक आमिष देण्याचा प्रयत्न केला. तक्रारदार यांनी हे आमिष धुडकाऊन लावल्यानंतर तक्रारदार यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. थेट गोळ्या घालू अन्यथा गाडीखाली घालण्याची धमकी यावेळी देण्यात आली. पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांना काही अडचण नाही तर तुझ्या बापाचे काय जाते असे म्हणत झटापट केली. तक्रारदार हे स्वतः पठार भागातील पत्रकार आहेत. अवैध धंद्यावर अंकुश लावण्याचे काम ते करत असतात. याआधी देखील वाळू तस्करी विरोधात विविध दैनिकांतून तसेच राजसत्ता न्यूज च्या माध्यमातून आवाज उठवला आहे. सरकार चा महसूल बुडवत हे वाळू चोर मोठ्या भावात म्हणजेच आव की साव भावात ही वाळू विकली जाते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. सर्वसामान्य नागरिकांची मोठी लूट हे तस्कर करत आहे.
वाळू तस्करांचे राजकीय संबंध
काही वाळू तस्कर हे थेट राजकीय नेत्यांचे निकटवर्तीय असल्याचे समोर येत आहेत. काही वाळू तस्कर हे थेट अधिकाऱ्यांच्या गाडीत बसून व चहापान करताना आढळून आले आहे. मागे साकूर गावातील सामाजिक कार्यकर्ते सचिन खेमनर यांनी वाळू तस्करी बाबत हेल्प लाईन क्रमांक 112 वर कॉल केला असता पोलीस प्रशासनाकडून मिळालेला अनुभव अतिशय वाईट आहे. त्यामुळे आम्हाला दिलेल्या धमकीला पोलीस प्रशासनाकडे दाद मागणे उचीत वाटले नाही. येथे रक्षकच भक्षक आहेत का असा प्रश्न निर्माण होत आहे.
तलाठी सर्कल संपर्क क्षेत्राच्या बाहेर
साकूर सर्कल यांना संपर्क केला असता यांचा मोबाईल संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. तर टाकळी ढोकेश्वर सर्कल यांना संपर्क केला असता त्यांनी कॉल ला उत्तर दिले नाही. तहसीलदार पारनेर यांना देखील संपर्क साधला असता त्यांनी देखील कुठलाही रिस्पॉन्स दिला नाही. वारंवार मेसेज द्वारे वाळू चोरी ची तक्रार केली परंतू प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही. उलट वाळू तस्करांना तक्रारदार यांची भेट घेण्यास सांगून तक्रारदारासच विकत घेण्याचा प्रयत्न केला गेला.

आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहिल्या कारणाने थेट या वाळूतस्करांनी जीवे मारण्याची धमकी दिली. आम्हाला आमच्या कर्तव्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला आहे. तर महसूल अधिकारी मात्र कानाला खडा लावून काही घडलेच नसल्याचा आव आणत आहेत. सध्या वाळू बंदी मुळे घरकुलांचे प्रश्न ऐरणीवर आहेत. सर्वसामान्य जनतेला घरांचे बांधकाम करण्यासाठी वाळू मिळत नाही, मात्र वाळू तस्करांना ही वाळू सहज उपलब्ध होते. त्यामुळे या परिसरात ‘गुंड’गिरी करत ‘वैभव’ प्राप्त केलेल्या या वाळू तस्करांच्या मुसक्या आवळाव्यात. अन्यथा लवकरच पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे समक्ष भेटून लेखी तक्रार करणार आहोत.(सहदेव जाधव: पत्रकार तथा संपादक राजसत्ता न्यूज पोर्टल)






