संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील प्रथितयश उद्योजक तथा शिवसेना नेते बाबासाहेब कुटे यांच्या ऑप्युलन्स स्कूल ऑफ एज्युकेशन विद्यालयाने बारावी बोर्डाच्या परीक्षेत याही वर्षी यशाची परंपरा कायम ठेवली. यंदाही उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत विज्ञान शाखेचा 100 टक्के निकाल नोंदवला आहे. सलग सात वर्षाची 100 टक्के निकालाची परपंरा ऑप्युलन्स स्कूल ऑफ एज्युकेशन विद्यालयाने कायम राखत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळ व शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हा उल्लेखनीय निकाल साध्य झाला आहे. विद्यालयातील दोन विद्यार्थिनींनी साकूर केंद्रात अव्वल क्रमांक मिळविला आहे. तसेच 15 पैकी 7 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.

या वर्षीच्या निकालात कु. आर्या संतोषकुमार थोपटे हीने ७९.५० टक्के गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला. तसेच कु. स्वामीनी हौशीराम दिवटे हिने ७०.३३ टक्के गुण मिळवत दुसरा क्रमांक मिळविला. तसेच चि. तन्मय अजित बागुल याने ६१ टक्के गुण मिळवत तिसरा क्रमांक मिळविला तर कु. ऋतुजा संजय ढेंबरे हिने ६०. ३३ टक्के गुण मिळवत चौथा क्रमांक व कु. दिपाली रोहिदास दाते हिने ६० टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक मिळविला आहे. तसेच कु. आर्या थोपटे व कु. स्वामीनी दिवटे या विद्यार्थ्यांनींनी साकूर केंद्रात अव्वल क्रमांक मिळविला आहे.

मांडवे बुद्रुक येथे ऑप्युलन्स स्कूल ऑफ एज्युकेशन या संस्थेची सुरुवात उद्योजक बाबासाहेब कुटे यांनी आठ वर्षांपूर्वी केली. ग्रामीण भागातील मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने बाबासाहेब कुटे यांनी या संस्थेची स्थापना केली. या स्कूलमध्ये पठार भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अभ्यास पुर्ण शिक्षण मिळावे यासाठी सर्व सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या आहेत. अनुभवी शिक्षक या स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. इयत्ता दहावी व बारावीच्या मुलामुलींना देखील शिक्षण या स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मिळत आहे. या स्कूलमध्ये बारावीची वाणिज्य व विज्ञान शाखा आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी या स्कूलमध्ये घडवला जातो. तसेच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जाते.
ऑप्युलन्स स्कूलच्या प्रगतीचा आलेख हा कायमच वाढत राहिलेला आहे. पठारभागात एक उत्कृष्ट शिक्षण संस्था म्हणून ऑप्युलन्स स्कूल नावारूपास आली आहे. वर्षभर विदयार्थ्यांच्या बौद्धिक प्रगतीसाठी येथील शिक्षक उत्कृष्ट ज्ञानार्जन करत आहेत. वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. हे स्कूल पालकांच्या पसंदीस पडत असून स्कूल चे कौतुक करत आहे.






