राहुरीमध्ये ५६.७२ टक्के मतदारांनी मतदान केले. आज (23 एप्रिल 2026) झालेल्या निवडणुकीत सायंकाळी ६ वाजेपर्यंत राहुरीमध्ये ५६.७२ टक्के मतदानाची नोंद झाली. सुरुवातीला, पहिल्या दोन तासात ६.४२ टक्के मतदान झाले. दुपारपर्यंत ४० टक्के मतदान झाले. बारामतीमध्ये ५४.९६ टक्के मतदान झाले.
राहुरी विधानसभा निवडणुकीत भाजपचे अक्षय कर्डिले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गोविंद मोकाटे यांच्यात प्रमुख लढत आहे. राहुरी पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. ही निवडणूक, आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी होत आहे. निवडणुकीत एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत, ज्यात अक्षय कर्डिले (भाजप), गोविंद मोकाटे (शरद पवार गट) यांचा समावेश आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे बारामतीची जागा रिक्त झाली होती. यातच अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या रिंगणात आहेत. दुसरीकडे राहुरीचे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले हे निवडणूक लढवत आहेत.
राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी ६ पर्यंत बारामतीमध्ये ५४.९६ टक्के, तर राहुरीमध्ये ५६.७२ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.







