इस्लामीकरणासाठी असा अट्टाहास योग्य आहे का.?
नाशिकमधील एका नामांकित मल्टिनॅशनल आयटी (IT) कंपनीतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि विनयभंग केल्याप्रकरणी तसेच इस्लाम धर्म स्विकारण्यासाठी जबरदस्ती करणे असे तब्बल 9 गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी 5 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, सुरुवातीला नोकरीसाठी शिफारस करून ‘तुला माझ्यामुळेच नोकरी मिळाली आहे’ अशी उपकाराची भावना निर्माण केली गेली. त्यानंतर कामाच्या सुट्टीच्या दिवशी महिला कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून त्यांना विविध रिसॉर्ट्सवर नेण्यात आले. तिथे त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. इतकेच नाही तर, महिलांच्या धर्माबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणे, इस्लाम धर्म किती महान आहे हे सांगण्याचा प्रयत्न करणे, त्यांच्या शरीराकडे पाहून अश्लील हावभाव करणे. तसेच एका तरुणावर धर्मांतरासाठी दबाव टाकणे असे धक्कादायक प्रकारही या कंपनीत सुरू होते. नाशिक पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सुरुवातीला कमालीची गोपनीयता पाळली होती. 25 मार्च रोजी पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर, 9 गुन्हे मुंबई नाका आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आले.

आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रझा मेमन आणि तौसिफ अत्तार या 5 संशयित धर्मांदाना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या वरील जिहाद्यांचे आणखी कोण साथीदार आहेत का याची देखील आता SIT कडून चौकशी करण्यात येईल. परंतू असे जिहादी कृत्य IT क्षेत्रात घडणे सामाजिक दृष्ट्या निंदनीय आहे. अशा या जिहादी वृत्ती च्या नांग्या शासनाने ठेसून काढाव्यात अशी मागणी हिंदू संघटना करत आहेत.
पहिला गुन्हा: जुलै २०२२ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीतील तीन सहकाऱ्यांनी पीडितेला विशिष्ट धर्माविषयी आक्षेपार्ह बोलून धार्मिक भावना दुखावल्या. एका संशयिताने लग्नाचे वचन देऊन पीडितेसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. तसेच अन्य एकाने कार्यालयात, जिन्यात पकडून पीडितेशी लैंगिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटलेले आहे.
दुसरा गुन्हा: मे २०२३ ते १९ मार्च २०२६ या कालावधीत कंपनीतील दोन सहकाऱ्यांनी पीडितेकडे रोखून पाहिले, स्पर्श करून वैयक्तिक वैवाहिक आयुष्याबाबत लज्जास्पद टिप्पणी केली. या संदर्भात पीडितेने कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्याकडे वारंवार तोंडी तक्रारी केल्या. त्यांनी तक्रारदाराच्या विनयभंगाच्या तक्रारीची दखल न घेता संशयितांच्या कृत्याला चिथावणी दिल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल आहे.
तिसरा गुन्हा: २०२२ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान कंपनीच्या बैठकीत एका संशयिताने एकटक महिला तक्रारदाराकडे पाहिले. वैवाहिक आयुष्यात संतती नसल्याबाबत लज्जास्पद बोलून, पकडून लैंगिक जवळीक साधण्यासाठी तक्रारदाराला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

चौथा गुन्हा: मे २०२५ ते डिसेंबर २०२५ या दरम्यान कंपनीतील एका संशयित कर्मचाऱ्याने तक्रारदाराशी जवळीक साधण्याच्या उद्देशाने खासगी आयुष्याविषयी लज्जास्पद गोष्टी विचारल्या. तसेच गैरवर्तन केले. विशिष्ट धर्माविषयी आक्षेपार्ह बोलून तक्रारदारासह अन्य सहकाऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या.
पाचवा गुन्हा: २०२२ ते २३ मार्च २०२६ दरम्यान बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या तीन संशयितांनी विशिष्ट धर्माविषयी आक्षेपार्ह बोलून पुरुष तक्रारदाराला त्यांच्या धर्माची प्रार्थना करायला भाग पाडले. विशिष्ट धर्माचा अपमान केला. तक्रारदाराला बळजबरीने मांसाहार सेवन करायला लावून त्याचे धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. विशिष्ट धर्मातील महिलांबाबत अश्लील शब्द आणि शेरेबाजी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल आहे.
सहावा गुन्हा: सप्टेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२६ या दरम्यान बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या दोन संशयितांनी तक्रारदाराच्या शरीरावरून अश्लील टिप्पणी केली. जाणीवपूर्वक स्पर्श करून तक्रारदाराच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. विशिष्ट धर्माविषयी आक्षेपार्ह बोलून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातवा गुन्हा: जून २०२५ ते मार्च २०२६ दरम्यान नामांकित कंपनीत पाच संशयितांनी महिला तक्रारदाराचा पाठलाग करून अश्लील शेरेबाजी करणे, स्पर्श करणे व अश्लील नजरेने पाहून विनयभंग केला. तसेच विशिष्ट धर्माविषयी अपशब्द बोलून धार्मिक भावना दुखावल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
आठवा गुन्हा: जानेवारी २०२५ ते आतापर्यंत कंपनीत एका संशयिताने महिला तक्रारदाराची इच्छा नसताना शारीरिक जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तक्रारदाराच्या खासगी आयुष्याबाबत वेळोवेळी बोलून तिची इच्छा नसताना प्रस्ताव मांडला. दुसऱ्या संशयिताने शरीराविषयी अश्लील टिप्पणी केली. दोन्ही संशयित अंगलगट करायचे.
नववा गुन्हा: जानेवारी २०२६ ते एप्रिल २०२६ या दरम्यान दोन संशयितांनी तक्रारदार महिलेसोबत अश्लील पद्धतीने भाष्य करून अश्लील चाळे केले. महिला तक्रारदाराची इच्छा नसताना तिच्या खासगी आयुष्याबाबत वारंवार विचारणा करून तिच्यावर नजर ठेवली. शरीरावरून अश्लील टिप्पणी करून तक्रारदाराच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल आहे.






