साकूर (प्रतिनिधी) : संगमनेर तालुक्यातील साकूर येथे श्रावणमासानिमित्त श्री विरभद्र अर्थात बिरोबा महाराजांच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने हजेरी लावतात. नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने परिसरातील हजारो भाविक नाशिक तसेच कोपरगाव येथे जाऊन पायी कावडीने गोदावरीचे पवित्र पाणी आणतात आणि श्री विरभद्र महाराजांना जलाभिषेक करतात.
नारळी पौर्णिमेच्या दिवशी मंदिर परिसरात जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक दाखल होत असल्याने येथे भव्य यात्रोत्सवाचे स्वरूप पाहायला मिळते. यावेळी आमदार अमोल खताळ यांनी श्री विरभद्र महाराजांच्या चरणी नतमस्तक होत मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी श्री विरभद्र देवस्थान परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून, भविष्यात या देवस्थानाला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचा मानस व्यक्त केला.

यावेळी पठारभागाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेमनर, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व साकूर गावचे युवा नेतृत्व रऊफ शेख, भाजपा कायदा सेल जिल्हा संयोजक अॅड.अमित धुळगंड, खांबे गावचे सरपंच रविंद्र दातीर, गुलाब भोसले, सुभाष पेंडभाजे, भिमराज जाधव, मच्छिंद्र खेमनर, किशोर खेमनर, संकेत खेमनर, राजेंद्र गोसावी, बाळू दिनकर खेमनर, तुषार पेंडभाजे, संतोष खेमनर, भाऊ डोंगरे, प्रमोद साळुंके, अझहर पटेल, गणेश गाडेकर, संतोष बिडकर, गोरख बागुल, अनिल आमले, सुरेश काळे, गणेश डोंगरे आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






