राजसत्ता न्यूज वृत्तसंस्था
राज्यातील धडाधडीचे आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे हे नुकतेच अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी रुजू झाले आहे. दरम्यान या विभागात रूजू झाल्याच्या पहिल्या दिवसांपासून त्यांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे.
मे महिन्याच्या शेवटच्या तीन दिवस चाललेल्या मोहिमेत त्यांनी 16 जिल्ह्यातील 47 आस्थापनांवर कारवाई केली. मुंढेंच्या या कारवाईमुळं भेसळ करणाऱ्यांचं धाबं दणाणलं आहे. या कारवाईनंतर आता जनतेला थेट तक्रार करण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी टोल फ्री क्रमांक आणि ई-मेल आयडी शेअर करण्यात आला आहे.तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले आहे. तसेच निकृष्ट व असुरक्षित अन्नपदार्थांवर कठोर कारवाईचा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. तुकाराम मुंढेंच्या या धडक कारवाईने राज्यभरात खळबळ माजली आहे. कधी कधी एखाद्या ठिकाणी पदार्थ आपण घेत नाही कारण त्यात भेसळ सुरू असल्याचे माहिती असते, पण याबाबत नेमकी कुठे तक्रार करायची याची नागरिकांनी माहिती नसते. त्यामुळे आता मुंढे यांनी नागरिकांनी थेट त्यांच्याकडे तक्रार करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे.

कुठे संपर्क साधावा?
अन्नातील आणि औषधातील भेसळीबाबत थेट तुकाराम मुंढे यांच्याकडे टोल फ्री क्रमांर तसेच इमेलद्वारे तक्रार नोंदवता येणार आहे. अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत शंका असल्यास तक्रार करताना संबधित आस्थापनेचा अचूक पत्ता आणि ज्या अन्नपदार्थात भेसळ होत आहे त्याची माहिती नमूद करण्याचे आवाहन केले आहे.टोल फ्री क्रमांक : १८००२२२३६५ई-मेल : jc-foodhq@gov.इन

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये छापेमारी
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार “Safe Food, Safe Drug, Safe Maharashtra” मोहिमेअंतर्गत 29 ते 31 मे 2026 दरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये छापेमारी करण्यात आली. मुंबई, नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, बीड, जालना, नांदेड, परभणी, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, वाशिमसह या अनेक जिल्ह्यांतील 47 आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत गूळ, खवा, बुंदी लाडू, बेकरी पदार्थ, कँडी, खाद्यतेल, तूप, खजूर, आईस्क्रीम, फ्रोजन डेझर्ट, मसाले, शेंगदाणा चिक्की आदी पदार्थांची तपासणी केली होती. या कारवाईत तब्बल 84 हजार 335 किलो संशयित अन्नसाठा जप्त करण्यात आला. या जप्त मालाची किंमत सुमारे 97 लाख 19 हजार 963 रुपये आहे.संशयित अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवले गेले आहेत.






