संगमनेर प्रतिनिधी : संगमनेर नगरपालिकेच्या कारभारा बाबत नागरिकांत तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त होत असून, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका, ही लाभार्थी ठेकेदारांना विशेष सवलती दिल्या जात असल्याचा आरोप करत निवडणुकीच्या काळात विकासाची आश्वासने देणारे आणि जनतेच्या सेवेसाठी विविध समित्यांची स्थापना करणारे लोकप्रतिनिधी नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांपासून आज दूर गेले असल्याची टीका महायुतीचे शशांक नामन यांनी पालिकेच्या सत्ताधाऱ्यां वर केली
संगमनेर शहरातील मालदाड रोड परिसरातील सौभाग्य मंगलकार्यालया जवळ नुकत्याच घडलेल्या एका प्रकारामुळे या नाराजीला अधिक खतपाणी मिळाले आहे. नागरिकां च्या म्हणण्यानुसार, एका ठेकेदाराच्या निवासस्थानी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नगरपालिकेच्या माध्यमातून नळ कनेक्शन देण्याचे काम सुरू होते. या कामासाठी नगरपालिकेची आवश्यक ती परवानगी होती का तसेच रात्रीच्यावेळी हे काम कोणाच्या आदेशाने करण्यात आले, यासारखे अनेक प्रश्न परिसरातील नागरिकांनी उपस्थित केले असून या प्रकरणाची नगरपालिका प्रशासनाने सखोल चौकशी करून खरी वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी,. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या दैनंदिन कामांसाठी नगरपालिकेच्या कार्यालयात अनेकदा हेलपाटे मारावे लागतात पाणीपुरवठा,रस्ते, स्वच्छता, आरोग्य यांसारख्या मूलभू स्वरूपाचे त प्रश्नांबाबत अनेक तक्रारी प्रलंबित असतानाच केवळ एका ठेकेदाराच्या कामासाठी प्रशासन एवढ्या तत्परतेने कार्यरत होत असल्याचे चित्र दिसत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे, शहरातील भाजी पाला विक्रेते हातावर पोट भरणारे छोटे व्यावसायिक यांच्यावर पालिका प्रशासन कारवाईचा बडगा उगारात आहे हा कुठला न्याय आहे असाही आरोप नामन यांनी केला.

जनतेच्या समस्या सोडवण्याऐवजी राजकीय नेत्यांच्या स्वागत-सत्कारात आणि वैयक्तिक हितसंबंध जपण्यात जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी अधिक व्यस्त असून नगरपालिकेच्या कारभारावर लोकप्रतिनिधींचे नियंत्रण राहिले आहे की नाही, याबाबतही शहरात उलट सुलट चर्चा सुरू आहे.”नगरपालिका नेमकी कर भरणाऱ्या जनतेची सेवा करण्यासाठी आहे की काही लाभार्थी ठेकेदारांची आहे?” याचे नगरपालिकेच्या प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.






