घारगाव पोलिसांनी पांढऱ्या रंगाचा टाटा कंपनीचा टेम्पो चार ब्रास वाळू सह पकडला. संगमनेर तालुका पठारभागात वाळूतस्करीचे माफियाराज संपेना
सविस्तर वृत्त असे की, घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एका पांढऱ्या रंगाच्या टाटा कंपनी चा MH 04 HS 2300 ढम्पर मुळा नदीवरून वाळू घेऊन निघाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांना प्राप्त माहिती नुसार हा वाळू ढम्पर काल रात्री साडे दहा वाजण्याच्या दरम्यान येठेवाडी शिवारात येठेवाडी खंदरमाळ रस्त्यावर पकडला.

संगमनेर तालुक्यातील पठार भागात वाळू तस्करीला आळा बसेना..? वाळू तस्करांचे थेट प्रशासनाला आवाहन…? पोलिसांची कारवाई, मात्र महसूल प्रशासन कधी जागे होणार…? पठार भागातील नागरिकांना पडलेला प्रश्न..!

पठार भागात वाळूतस्करांची मुजोरी ही गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. शेतकऱ्याच्या कारवर गाडी घालण्यासह पत्रकारांना लाच देण्याच्या प्रयत्नसह गोळ्या घालण्याचा झालेला प्रकार हा अतिशय निंदनीय आहे. वाळू तस्करांची वाढती दहशत व यांना मिळणारे राजकीय पाठबळ यावरून पठार भागात अवैध धंद्याना बळकटी मिळून आली आहे.
दैनिक प्रहार वृत्तपत्राचे प्रतिनिधी यांनी निर्भीड पणे या पिडीत शेतकऱ्याला न्याय देण्याच्या हेतूने वृत्तांकन केले. परंतू त्यांनाच गावठी कट्टे काढून गोळ्या घालण्याचा प्रकार सराईत गांजा व वाळू तस्कर अजित मोरे व त्याच्या सहकार्यांकडून झाला. यामुळे या वाळू तस्करांची मुजोरी किती वाढली हे निदर्शनास येते. महसूल प्रशासन सध्या झोपेचे सोंग आणत असल्याचा आरोप जांबुत गावचे उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी केला आहे.
अनेकदा तक्रार करूनही जांबुत गावचे कामगार तलाठी, साकूर मंडल अधिकारी, नांदूर खंदरमाळ मंडल अधिकारी, किंवा तहसीलदार हे कारवाई करत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. साकूर पठार भागातील एक आका या वाळू तस्करांना राजकीय अभय देत आहे. महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनावर देखील या आकाचा दबाव असल्याचा आरोप सुभाष डोंगरे यांनी केला आहे.
या आकाचा आशीर्वाद असणाऱ्या अवैध धंद्यावर मात्र कारवाई होत नाही. ज्याच्यावर आशीर्वाद नाही त्याच्यावर मात्र संक्रात बसलेली काही दिवसांपूर्वी आपण बघितले आहे. त्यामुळे ज्याच्या डोक्यावर या आकाचा हात तो सर्व अवैध कृत्य करण्यास आघाडीवर … असो आता घारगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी कारभार हाती घेतला आहे. येणाऱ्या काळात तरी या सर्व अवैध धंद्याना लगाम लागेल अशी अपेक्षा धरूया..






