संपादकीय: सहदेव जाधव/ रुग्णाच्या जीविताशी खेळ थांबणार का? भ्रष्ट कारभाराला अंकुश
राज्यात ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. बोगस डॉक्टरांचे हे लोण आता शहरी भागातही पसरू लागले आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टनुसार भारतात एकूण अॅलोपॅथी उपचार करणार्या डॉक्टरांपैकी 57.3 टक्के डॉक्टर हे बोगस असल्याचे नमूद करण्यात आले आहे;
तर सेंट्रल ब्यूरो ऑफ हेल्थ इंटेलिजेंसच्या रिपोर्टमध्ये महाराष्ट्रात नऊ हजारांहून अधिक बोगस डॉक्टरांकडे कोणतीही प्रमाणित वैद्यकीय पदवी नसताना ते रुग्णांना उपचार देत असल्याचे म्हटले आहे. या आकडेवारी पेक्षा कितीतरी जास्त संख्येने बोगस डॉक्टर आज राज्यात सर्रास रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील राज्यातील प्रत्येक गाव बोगस डॉक्टरांच्या विळख्यात अडकला असून, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पुरेशी यंत्रणा कार्यरत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात देखील बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुटला आहे. आरोग्य विभाग मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष्य करताना दिसत आहे. त्यामुळे या मुन्नाभाई चा गोरख धंदा जोमात सुरु आहे. परंतू या मुन्नाभाई मुळे अनेक रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तरीही गावपातळीवर असलेल्या राजकीय आशिर्वादामुळे यांच्या या नकली वैद्यकीय पेशाला बळकटी मिळत आहे. आरोग्य विभागाच्या वतीने अशा डॉक्टरांचा शोध घेऊन कारवाई करणे गरजेचे आहे. बोगस डॉक्टर कुठलीही वैद्यकीय पदवी नसताना रुग्णांना इंजेक्शन व इतर औषधोपचार देताना आढळून आले होते. या डॉक्टरांकडे मोठ्या प्रमाणात अॅलोपॅथी औषधे, सलाईन, इंजेक्शनचा साठा असतो. त्यावर एक्सपायर झालेले औषधे आढळून आलेले आहे. ग्रामीण भागात तर ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून, अनेक बोगस डॉक्टर स्वत: जवळ कुठलीही प्रमाणित पदवी नसताना इंजेक्शन देण्यापासून थेट ऑपरेशन करण्याइतपत मजल गाठतात.
अशाच चुकीच्या पद्धतीने ऑपरेशन केल्यामुळे पेशंटला आपला जीव गमवावा लागला असल्याचे उदाहरणे घडली आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बोगस डॉक्टर्स कार्यरत आहेत. फक्त ग्रामीण भागातच नव्हे, तर आता शहरी भागातदेखील बोगस डॉक्टरांची संख्या झपाट्याने वाढत असून, या बोगसगिरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागाकडे पुरेशी यंत्रणाच नसल्याचे आम्हास निदर्शनास आले आहे.

केंद्र शासनाने अॅलोपॅथी, आयुर्वेद सिद्ध, युनानी, होमिओपॅथी आणि नॅचरोपॅथी योग या चिकित्सा पद्धतींना मान्यता दिली आहे. तसेच अॅक्युपंचर, हिप्नोथेरपी या आरोग्य विज्ञानाच्या दोन शाखांना स्वतंत्र चिकित्सा पद्धती म्हणून मान्यता दिली नाही. याबाबत केंद्र शासनाचे असे निर्देश आहेत की, या दोन शाखांमधील व्यवसाय नोंदणीकृत वैद्यक व्यावसायिक अथवा योग्य प्रकारे प्रशिक्षित व्यक्ती करू शकते. तसेच त्या-त्या राज्यातील मेडिकल कौन्सिलची नोंदणी बंधनकारक आहे. याखेरीज अन्य कुठल्याही वैद्यकीय सेवा देणार्यांना बोगस असे ठरवण्यात आले आहे. बोगस डॉक्टरांना आळा बसावा म्हणून शासनाने अधिनियम 1961 मधील कलम 33, 38 मध्ये सुधारणा केली आहे. अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणार्यांचा शिक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. हे सर्व गुन्हे दखलपात्र अजामीनपात्र ठरवण्यात आले आहेत.
आम्ही केलेल्या स्टिंग ऑपरेशन नुसार काही होमिओपॅथी डॉक्टरांना 30 ते 31 बेडची परवाणगी दिल्याची सर्टिफिकेट या कथित डॉक्टरांकडे आहेत, परंतू ही परवानगी कशी दिली हा संशोधनाचा विषय आहे. यावेळी आम्ही घेतलेल्या माहिती नुसार येथे आम्ही ऑन कॉल MBBS किंवा MD, MS डॉक्टर यांची नियुक्ती केल्याचे सांगितले. परंतू प्रत्यशात येथे अशी परिस्थिती नाही शासनाच्या डोळ्यात सर्रास धुळफेकून हे लोक शासनाने घालून दिलेले नियम पायंदळी तुडवताना दिसत आहे. आरोग्य विभागाकडे चौकशी केली असता आरोग्य विभागाचे अधिकारी या अशा डॉक्टरांना पाठीशी घालताना दिसत आहे.
आम्ही पाथर्डी शहरात अशाच एका हॉस्पिटल चे स्टिंग ऑपरेशन केले असता.. येथील डॉक्टर कडे त्याचे वैद्यकीय पदवी आढळून आली नाही त्याच्या हॉस्पिटल वर लावलेले बोर्डवर ऍक्सीडेन्ट, ट्रामा, आय सी यू, आर्थो असे लिहिलेले आहे. परंतू त्याची डिग्री लिहलेली नाही त्यामुळे संशयाला जागा मिळते. या डॉक्टर कडे तशी चौकशी केली असता त्याच्याकडून उलट सुलट उत्तर देण्यात आली. उडवा उडावीची उत्तरे देत असताना बोर्डावर डिग्री टाकलीच पाहिजे का असा उत्तर देण्यात आले. मेडिकल मधून औषध देण्यात येणाऱ्या चिट्ठी वर देखील डॉक्टर ची पदवीचा उल्लेख नाही असे निदर्शनास आले. त्यामुळे या ठिकाणी शहराच्या महत्वाच्या ठिकाणी हे हॉस्पिटल दिमाखात सुरु आहे. तरीही आरोग्य विभाग याकडे सोईस्कर दुर्लक्ष्य करत असल्याचे आढळून आले आहे.
एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या हाताखाली कंम्पाउडर किंवा परिचारक म्हणून काम केलेल्या काही व्यक्तींनी बोगस दवाखाने उघडल्याचे गेल्या काही वर्षांत समोर आले आहे. काेठून तरी बनावट प्रमाणपत्र मिळवायचे आणि स्वतःचा दवाखाना सुरू करायचा, अशी त्यांची कार्यपद्धती असते. थोडेफार संशयित वातावरण वाटल्यास दवाखाना दुसऱ्या शहरात स्थलांतरित करून रुग्णांच्या जीवाशी खेळ करून बक्कळ पैसा ते कमावतात. काही वर्षे तज्ज्ञांच्या हाताखाली काम केलेले असल्याने हे बोगस डॉक्टरही त्यांच्या इतकेच तज्ज्ञ असतात. साध्या सर्दी तापापासून लहान सहान शस्त्रक्रिया ते सहज करू शकतात. त्यामुळे बोगस डॉक्टर ओळखणे कठीण असते. अशावेळी वैद्यकीय प्रमाणपत्र हेच त्यांना बोगस सिद्ध करण्याचे प्रमुख हत्यार असते. रुग्णांनी डॉक्टरकडे जाण्यापूर्वी पुरेपूर खात्री करून घ्यावी. खोट्या प्रमाणपत्र आधारे प्रॅक्टिस करणारा औषधांची नावे किंवा आजाराचे वैद्यकीय नाव उच्चारताना बऱ्याचदा गफलत करतो.
आम्ही केलेल्या स्टिंग ऑपरेशन नुसार नगर जिल्ह्यात अनेक हॉस्पिटल मध्ये रुग्णांची हेळसांड होताना दिसत आहे. शासनाने दिलेल्या नियमांना तिलांजली देऊन हे हॉस्पिटल रुग्णांच्या जीविताशी खेळत आहेत. डॉक्टर ऑन कॉल येतात सांगून फक्त रजिस्टर वर सह्या करून ऑन कॉल डॉक्टर येत असल्याची कायदेशीर बाब सोईस्कर पूर्ण केल्याचे दिसून येतेय. तरीही हे डॉक्टर जे की BHMS पदवी घेतलेले संपूर्ण हॉस्पिटल चालवताना दिसत आहे. तीस ते ऐकतीस बेड चे हॉस्पिटल हे डॉक्टर चालवतात. विशेष म्हणजे येथे छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया देखील येथे होताना दिसत आहे. येथे कुठलाही प्रशिक्षित स्टाफ नाही. असे असताना देखील या हॉस्पिटल वर आरोग्य विभाग काहीही कारवाई करताना दिसत नाही.
त्यामुळे अहिल्यानगर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष्य देऊन संबंधित बोगस डॉक्टर व हॉस्पिटल ची सेवा नियमात न देणाऱ्या डॉक्टर व हॉस्पिटल वर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करत आहे.





