संपादकीय: सहदेव जाधव
जामीनावर बाहेर येताच युसूफ चौगुले हा आपल्या गुन्हेगारी जगतात सक्रीय झाल्याचे समोर आले आहे. त्याने संगमनेर तालुक्यातील पठार भागात अवैध व्यवसायासाठी आंतरराज्य टोळी सक्रीय केली असल्याचा संशय व्यक्त होत आहे…आणि हा अवैध व्यवसाय करण्यासाठी युसूफ चौगुले या टोळीचे नेतृत्व करतोय.?
काल परवा नाशिक पुणे महामार्गांवर गुटख्याची वाहतूक करताना संगमनेर तालुका पोलिसांनी स्कॉर्पिओ गाडी पकडली. तसेच शहर पोलिसांनी देखील मोठी कारवाई करत गांजा तस्करांची वेसण आवळली. गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यातील अवैध व्यवसाय पोलिसांच्या रडारवर आहेत. संगमनेर तालुक्यात सत्तांतर झाले अमोल खताळ आमदार झाले. यानंतर या अवैध व्यवसाय करणाऱ्यांना चांगलाच आळा बसला. संगमनेर मधील मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या अवैध धंद्याना परिवर्तन झाल्यानंतर आळा बसला. पण पठार भागात मात्र दोन वर्षे तुरुंगात राहून आल्यानंतर अवैध धंद्याचा मास्टर माईंड असलेला युसूफ चौगुले पुन्हा या व्यवसायात सक्रीय झाला असल्याचे दिसून येत आहे.

युसूफ चौगुले याचा गुटखा संगमनेर तालुका पोलिसांनी काल परवा पकडला. जवळपास सात लाखांचा गुटखा तसेच 12 लाख रुपये किमती ची स्कॉर्पिओ देखील यावेळी संगमनेर तालुका पोलिसांनी जप्त केली. यामुळे कधी गावठी कट्टे, गांजा तस्करी, गुटखा तस्करीचे रॅकेट चालवणारा युसूफ पुन्हा सक्रीय झाला असल्याचे समोर आले आहे. तर पुन्हा एकदा पठार भागातील गुटखा तस्करीने डोके वर काढल्याचे दिसून येतेय… जामीनावर बाहेर येताच गुटखा किंग ठरलेला युसूफ चौगुले यांचे काळे कारनामे पुन्हा सुरु झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. युसूफ चौगुले हा घारगाव येथील रहिवाशी असून त्याच्यावर घारगाव पोलीस ठाण्यासह इतर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. घारगाव जवळील एका गावात घडलेल्या लव जिहाद मधील प्रकरणात तो मुख्य आरोपी आहे. या गुन्ह्यात तो जवळपास दीड वर्ष कैदेत होता. त्याला या गुन्ह्यात सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर त्याला मध्य प्रदेश पोलिसांनी गावठी कट्टे बाळगताना रंगेहात पकडले होते. यावेळी त्याला व त्याच्या साथीदारांना मध्य प्रदेश पोलिसांनी पाठलाग करून मोठ्या शिताफिने अटक केली होती. यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयच्या जामीनाचे नियम तोडल्यामुळे त्याचा जामीन रद्द झाला. आणि त्याला पुन्हा बेड्या ठोकण्यात आल्या या सर्व घडामोडीत युसूफ हा जेलमध्ये बसून आपली गुन्हेगारी दुनिया मात्र चालवतच राहिला. काही दिवसांपूर्वी घारगाव पोलिसांनी त्याची इनोव्हा कार रणखांब फाटा येथे गुटखा वाहतूक करताना पकडली होती. यात त्याचा जांबुत येथील एक हस्तक पकडण्यात पोलिसांना यश मिळाले होते. युसूफ जेलमध्ये राहून देखील त्याचा हा धंदा बाहेर कोण चालवत होते याचा तपास मात्र पोलिसांना करता आला नाही. किंवा पोलिसांनी तशी तसदी घेतली नाही.
युसूफ चौगुले हा ज्या भागात रहिवासी आहे तो भाग घारगाव पोलीस ठाणे हद्दीत येतो. येथूनच तो आपली गुन्हेगारी चालवतो. लव जिहाद प्रकारणानंतर त्याच्याविरोधात हिंदू संघटनानी मोर्चे काढून त्याच्या काळ्या कारणाम्याची माहिती समोर आणली. यात आर्थिक परिस्थितीत हतबल असलेल्या तरुणांना हाताशी धरून त्यांना या व्यवसायात ओढले व त्यांच्या माध्यमातून आपली गुन्हेगारी व्यवसाय सुरु ठेवला. अतिशय शातीरपणे युसूफ ने एक टोळी निर्माण केली व आजही युसूफ ती यशस्वी पणे चालवत आहे आणि तुरळक कारवाई वगळता त्याचा धंदा जोमात सुरु असल्याचे बोलले जात आहे.

युसूफ चे संबंध थेट आंतरराज्य टोळ्यांशी
सोमवारी 2/3/2026 रोजी पहाटे साडे पाच वाजता पुणे नाशिक हायवे वर कऱ्हे घाटात संगमनेर तालुका पोलिसांनी मोठी कारवाई केली. गुटखा आणि सुगंधी तंबाखू पकडण्यात पोलिसांना मोठं यश आले आहे. विशेष म्हणजे हा गुटखा थेट गुजरात येथील सिल्वासा येथून आणला असल्याची कबुली युसूफ चा हस्तक असलेला शाम काळे याने दिली. यावरूनच युसूफचे नेटवर्क हे आंतर राज्य असल्याचे निदर्शनास येते. मागील वर्षी युसूफला गावठी कट्ट्याची तस्करी करताना मध्य प्रदेश पोलिसांनी रंगेहात पकडले होते. यावेळी त्याला त्याच्या साथीदारांसह ताब्यात घेण्यात आले होते. अक्षरशः फिल्मी स्टाईल पाठलाग करून पोलिसांनी युसूफ ला साथीदारांसह पकडले होते. तसेच घारगाव येथे झालेल्या लव जिहाद विरोधी आंदोलनात अनेकांनी युसूफचे गांजा तस्करीशी कनेक्शन असल्याचा आरोप केला होता. यावेळी त्याचे गांजा तस्करीशी थेट ओडिसा कनेक्शन असल्याची चर्चा झाली होती. त्यामुळे युसूफ हा आंतरराज्य टोळीशी संबंधित असल्याचे मोठी चर्चा घारगाव सह पठारभागात सुरु आहे.
युसूफ चौगुले आणि त्याचे जिहादी कृत्य
पठार भागातील घारगाव जवळील गावात एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून व नंतर तिचे धर्मांतर करून तिचा निकाह एका मुस्लिम तरुणाशी लावण्यात आला या प्रकरणातील मास्टर माईंड युसूफ चौगुले हाच होता. युसूफ चौगुले याने त्याच्या स्वतःच्या गाडीतून या मुलीचे अपहरण केले व तिचे धर्मांतर केले. परंतू हिंदू संघटनानी दाखवलेल्या सतर्कतेमुळे या मुलीची सुटका करण्यात आली. व याच प्रकरणात पीडित मुलीने दिलेल्या जबाबानुसार युसूफवर ऍट्रॉसिटी, बलात्कार, पोस्को सह अपहरण चा गुन्हा दाखल करण्यात आला. याच गुन्ह्यात युसूफला घारगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या घटनेतूनच युसूफ चौगुले चे जिहादी कृत्य समोर आले. यानंतर युसूफ च्या हस्तकांनी पारनेर तालुक्यातील सुपा येथे जाऊन पीडितेला व तीच्या आईला धमकावल्याचा प्रकार समोर आला होता. यामुळे युसूफ ने आपल्या हस्तकांमार्फत आपली टोळी जेलमध्ये असताना देखील सक्रीय ठेवली होती. परंतू ही टोळी युसूफ जेलमध्ये असताना कोण चालवत होता याचा तपास मात्र पोलीस करू शकले नाहीत. युसूफ जामीनावर बाहेर येताच गुन्हेगारी जगतात सक्रीय काल तब्बल 7लाख 20 हजार रुपयांचा प्रतिबंधित केलेला गुटखा संगमनेर तालुका पोलिसांनी हस्तगत केला . यावेळी पोलिसांनी 12 लाख रुपयांची आलिशान स्कॉर्पिओ कार MH 46 X4046 ही ताब्यात घेतली. जवळपास 7 लाखांचा गुटखा यावेळी पोलिसांनी हस्तगत केला. यावेळी ताब्यात घेतलेल्या शाम काळे याने हा गुटखा युसूफ चौगुले याच्या सांगण्यावरून आपण घारगाव येथे घेऊन चाललो असल्याची कबुली दिली. त्यानुसार तालुका पोलिसांनी युसूफ वर देखील गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार अमित महाजन यांनी दिलेल्या फिर्यादी वरून शाम कोंडीभाऊ काळे, रा. रणखांब फाटा, युसूफ चौगुले रा. घारगाव, शक्ती ट्रेडर्स चे मालक धीरज माळी रा. सिल्वासा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाम काळे याला संगमनेर तालुका पोलिसांनी अटक केली असून त्याने पोलिसांना दिलेल्या माहिती नुसार हा गुटखा युसूफ चौगुले याच्या सांगण्यावरून घारगाव येथे घेऊन चाललो असल्याचे सांगितले. यावरून युसूफ चौगुले याची काळे कारनामे बंद होण्याचे नाव घेत नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
युसूफ चौगुले व त्याच्या हस्तकांना आवरा अन्यथा मोठी घटना घडण्याची शक्यता
युसूफ चौगुले व त्याचे हस्तक यांच्याकडून होणारे गुन्हेगारी कृत्य दिवसेंदिवस वाढत आहेत. गुटखा गांजा तस्करीतून छोटे मोठे तस्कर ग्राहक युसूफ चे हस्तक बनलेत. पुणे नाशिक महामार्गांवर धाब्यावर चालू असलेली अवैध दारु सोबतच गांजा विक्री होत असल्याचे प्रकार आढळून आले आहे. परंतू दारु पकडली जाते पण गांजा का पकडला जात नाही हा देखील संशोधनाचा विषय बनला आहे. पठार भागात अनेकांकडे येणारा गांजा हा कुणाच्या माध्यमातून येतो याचा तपास करणे गरजेचे आहे. युसूफ चौगुले व त्याचे हस्तक सोशल माध्यमातून पत्रकारांना धमकावत आहेत. तर कुणी ठोकून काढण्याची धमकी देत आहेत. यावरूनच युसूफ चौगुले व त्याच्या हस्तकांकडून पत्रकारांच्या जीवितास देखील धोका संभावत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने युसूफच्या गुन्हेगारी दुनियेला आळा लावावा अशी मागणी पठार भागातील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, नोकरदार, व्यापारी व राजकीय क्षेत्रातील लोक करत आहे.





