संपादकीय : सहदेव जाधव यांचा निर्भीड निष्पक्ष वृत्तांकन
साकूर जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण व्यक्ती साठी आरक्षित झाला असून येथून इच्छुकांची भाऊंगर्दी वाढली आहे. साकूर गट हा तसा कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. सध्या निवडणूकीची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. कॉंग्रेसने साकूर जिल्हा परिषद गटावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्या नेतृत्वाखाली झेंडा फडकला आहे. त्यामुळे या गटावर कॉंग्रेसची मजबूत पकड आहे.
लवकरच जिल्हा परिषदेची निवडणूकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात. परंतु या निवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी कॉंग्रेस थेट मेडिसिन व्यावसायिक बाळासाहेब भाऊसाहेब सागर या युवकाला तिकिट दिले आहे. बाळासाहेब सागर यांचं नाव निश्चित झाले असून फक्त उमेदवाराची अधिकृत घोषणा बाकी आहे. बाळासाहेब सागर यांची उमेदवारी निश्चित असल्याने तसा प्रचार बाळासाहेब सागर यांनी सुरू केला आहे. सोशल मीडियावर बाळासाहेब सागर यांचा त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. एक स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितले जात आहे. बाळासाहेब सागर हा तरुण राजकीय क्षेत्रात नवखा वाटत असला तरी साकूर गटात त्यांच्या सागर परिवाराचे मोठं प्रस्त आहे. यातून त्यांच्या विजयाची गुढी उभारली जाईल अशी चर्चा साकूर गटात सुरु आहे.
बाळासाहेब सागर हा तरुण एक यशस्वी व्यावसायिक म्हणून गणला जातो. त्यांच्याकडे समाजसेवेचा वारसा आहे. आपले आजोबा स्व. बापूराया सागर यांच्यापासून त्यांना समाजसेवेचा वारसा आहे. बाळासाहेब सागर यांचे वडील भाऊसाहेब सागर हे देखील बाजार समिती चे सभापती शंकरराव पाटील खेमनर यांचे खंदे समर्थक आहेत. त्यामुळे शंकरराव पाटील खेमनर हे किंगमेकर ठरतील का हे बघणं महत्वाचे ठरणार आहे.

पठारभागात कायम किंगमेकर ठरलेले शंकरराव पाटील खेमनर
साकूर गट हा कायम काँग्रेस चा बालेकिल्ला राहिला आहे. या गटात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना मानणारा मोठा वर्ग आहे. येथून सध्या संगमनेर बाजार समितीचे सभापती शंकर पाटील खेमनर व सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत पाटील खेमनर हे या गटाचे नेतृत्व करत आहेत. शंकरराव पाटील खेमनर हे काँग्रेसचे चाणक्य समजले जातात. त्यांनी हातात घेतलेली एकही निवडणूक ही पराजित नाही. प्रत्येक निवडणूक ही अजय ठरलेली आहे. त्यामुळे शंकराराव पाटील खेमनर या निवडणुकीत देखील किंगमेकर ठरतील का हे बघणं महत्वाचे राहणार आहे.
महायुतीतील नाराजी काँग्रेस च्या पथ्यावर
महायुती मधील अंतर्गत गटबाजी ही काँग्रेस च्या पथ्यावर पडण्याची शक्यता नाकरता येणार नाही. महायुती चे संभाव्य उमेदवार गुलाब भोसले यांच्यावर महायुती च्या अनेक कार्यकर्त्यांची नाराजी आहे. ही नाराजी महायुती ला परवडणारी नाही परंतु पक्षश्रेष्ठी नी गुलाब भोसले यांना देऊ केलेली उमेदवारी काँग्रेस च्या बाळासाहेब सागर यांच्या पथ्यावर नक्कीच पडेल. त्यात ओबीसी व मुस्लिम मतदार हा गुलाब भोसले यांच्या जातीयवादी वक्तव्याने नाराज आहे. सतत जातीवाचक शिवराळ भाषा वापरणाऱ्यास उमेदवारी नको, यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे. गुलाब भोसले सोडून पक्षाने कोणताही उमेदवार द्यावा आम्ही निवडून आणू असे एका बड्या नेत्याने आमच्याशी बोलताना सांगितले आहे. त्यामुळे महायुती ची नाराजी ही काँग्रेस च्या पथ्यावर पडते की काय असा प्रश्न निर्माण होत आहे.

बाळासाहेब सागर शांत संयमी मनमिळाऊ युवक
बाळासाहेब सागर हा एक शांत, संयमी आणि मनमिळाऊ कार्यकर्ता आहे. ते युवक काँग्रेस चे पदाधिकारी आहेत. आपल्या याच स्वभावाच्या जोरावर जेष्ठ आणि कनिष्ठ असा मेळ बसवून निवडणुकीसाठी सज्ज झालेले आहे. मोठ्यांना मान सन्मान कसा द्यावा ते या युवकाकडून शिकण्यासारखे आहे. एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणून साकूर पठार भागात बाळासाहेबांना ओळखले जाते. लहानग्या पासून वृद्धापर्यंत त्यांना सन्मान कसा द्यावा यांचे बाळकडूच लागते ते बाळासाहेबांमध्ये हुबेहूब दिसते. त्यामुळे येणारी निवडणूक ही बाळासाहेब सागर यांना त्यांच्या स्वभावामुळे विजय मिळेल यात शंका नाही.

काँग्रेस ची सध्या सावध भुमिका, तर महायुतीत गडबड गोंधळ!
साकूर गटातून मागील विधानसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता काँग्रेस सध्या सावध भूमिकेत आहे. आपली कुठलीही रणनीती उंबरठ्या बाहेर येऊ देत नाहीत. त्यामुळे किंतु परंतु सांगणे सोपे नाही त्यामुळेच ही निवडणूक सहज सोपी राहणार नाही. ही निवडणूक काँग्रेस चे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रतिष्ठेची राहणार आहे. महायुती मध्ये असलेला मोठ्या अंतर्गत कलहावर स्थानिक नेत्यांसह काँग्रेसश्रेष्ठीचे मोठे लक्ष लागलेले आहे. महायुती मधील अंतर्गत कलह लपून राहिलेला नाही. तर काँग्रेस मध्ये देखील किरकोळ वाद दिसून येतात. पण हे वाद शमविण्यात काँग्रेस पक्षश्रेष्ठीना यश आले आहे. परंतु महायुती तील वादाला जेष्ठ नेते दुर्लक्षित करत असल्याने मोठे बंड होण्याची दाट शक्यता दिसत आहे.
काँग्रेस उमेदवार बाळासाहेब सागर यांना फायदा कसा?
पठार भागाची बुलंद तोफ म्हणून ज्यांना संपूर्ण तालुका ओळखत होता असे स्व. बुवाजी पाटील खेमनर हे देखील बाळासाहेब खेमनर यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी करत होते, तसेच नव्याने भाजप मध्ये दाखल झालेले गुलाब भोसले यांनी तालुका अध्यक्ष पद दिल्यानंतर जुन्या कार्यकर्त्यांना डावल्याने स्व. बुवाजी पाटील खेमनर हे देखील नाराज होते. गुलाब भोसले भाजप मध्ये दाखल होताच त्यांनी सवता सुभा तयार केला त्यामुळे मूळ पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले. पक्ष पातळीवरील मिटिंग परस्पर करणे, पक्षातील जेष्ठ नेत्यांना जाणूनबुजून बाजूला ठेवणे, हा उपक्रम त्यांनी अमलात आणला. त्यांच्या एक कलमी कारभारामुळे जेष्ठ कार्यकर्त्यांसह जुने पदाधिकारी नाराज झाले.

काँग्रेस मध्ये समन्वय तर महायुती अनभिज्ञ
सध्या साकूर गटात काँग्रेस मध्ये तूरळक प्रकार वगळता समन्वय दिसून येत आहे. शंकरराव पाटील खेमनर व इंद्रजित पाटील खेमनर यांनी सर्व कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला देत उमेदवाराच्या पाठीशी भक्कम उभे राहण्याचे कार्यकर्त्यांना सांगितले आहे. तर महायुती च्या गटात मात्र उमेदवार आपलीच ‘री’ ओढत असल्याने समन्वय साधला जात नाही. त्यामुळे येणारी निवडणूक ही काँग्रेस उमेदवार बाळासाहेब सागर यांचा विजय सांगून जात आहे.






