संपादकीय :सहदेव जाधव, निर्भीड निष्पक्ष वृत्तलेख
साकूर गटातील प्रबळ दावेदार असलेले बाळासाहेब कोंडाजी खेमनर सध्या ही निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. बाळासाहेब कोंडाजी खेमनर हे साकूर पठार भागातील भाजप चे जेष्ठ नेते आहेत. त्यांनी पुन्हा जिल्हा परिषद लढवण्याची मनिषा व्यक्त केल्याने येणारी निवडणूक काट्याची होण्याची चिन्ह दिसत आहे. बाळासाहेब कोंडाजी खेमनर यांचा गेल्या पन्नास वर्षांपासून राजकीय क्षेत्रात तालुक्यामध्ये मोठा दबदबा आहे. साकूर पठार भागातून ते भाजप चे नेतृत्व करतात. विखे पाटील यांचे ते खंदे समर्थक आहेत.
खा. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पासून ते विखे परिवाराचे कट्टर समर्थक आहेत. साकूर गट हा वर्षानुवर्षे काँग्रेस चा बालेकिल्ला राहिलेला आहे. स्व. तुकाराम पाटील खेमनर यांच्यानंतर हा गट काँग्रेस च्या म्हणजे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कडे राहिलेला आहे. स्व. तुकाराम पाटील खेमनर यांच्या निधनांनंतर हा गट बाजीराव पाटील खेमनर यांच्याकडे आला आणि तेव्हा पासून येथे बाजीराव पाटील खेमनर, स्व.हनुमंता पाटील खेमनर यांनी व यांच्या नंतर स्व. अशोक पाटील खेमनर, शंकर पाटील खेमनर यांनी येथील धुरा सांभाळली. सध्या शंकर पाटील खेमनर यांच्या जोडीला स्व. अशोक पाटील खेमनर यांचे जेष्ठ चिरंजीव इंद्रजित पाटील खेमनर यांचे वर्चस्व या गटावर आहे. म्हणजेच जवळपास तिसरी पिढी आज साकूर पठार भागाचे नेतृत्व बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी पणे करत आहे. यावरूनच हा गट काँग्रेस चा बालेकिल्ला समजला जात आहे. तर येथून अनेक वर्षांपासून एकमेव बाळासाहेब कोंडाजी खेमनर या वरील सर्वाना विरोध करत आले आहेत.

बाळासाहेब कोंडाजी खेमनर एक संघर्षशाली योद्धा
बाळासाहेब कोंडाजी खेमनर यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक निवडणुका लढल्या. त्यात त्यांची सध्याचे पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांच्यासोबत ची लढाई अविस्मरणीय ठरली. या निवडणुकीत बाळासाहेब कोंडाजी खेमनर यांचा पराभव जरी झाला तरी त्यांनी मतदारांच्या हृदयात आपले घर केले. स्वतः तांबे आणि थोरात परिवाराने बाळासाहेब कोंडाजी खेमनर यांचे कौतुक केले होते. ही निवडणूक राज्यभर गाजली होती. अटी तटीच्या या निवडणुकीत बाळासाहेब यांचा पराभव झाला. स्व. अशोक पाटील खेमनर व बाळासाहेब खेमनर यांच्यात देखील लढत झाली होती परंतु येथे देखील बाळासाहेब यांचा निसटता पराभव झाला होता त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रस्थापितांच्या विरोधात बाळासाहेब खेमनर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह एकाकी झुंज दिली. आता मात्र वातावरण बदलले आहे.
मागील वर्षी बाळासाहेब थोरात यांचा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे साकूर पठार भागात आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून अनेक निधी मिळाला आहे. त्यामुळे बाळासाहेब खेमनर यांना येथून पोषक वातावरण आहे. जेष्ठतेचा मान सन्मान व्हावा पठार भागाची इच्छा.

बाळासाहेब खेमनर यांनी ही जिल्हा परिषद निवडणूक लढवावी अशी इच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. साकूर जिल्हा परिषद गटातून अनेकजण महायुती कडून इच्छुक आहेत परंतु महायुती कडून साकूर गटातून उमेदवारी बाळासाहेबानाच दिली जावी अशी मागणी पठार भागातील एक मोठा गट करत आहे. बाळासाहेब खेमनर यांनी देखील ही शेवटची कुस्ती खेळूच असा निर्धार व्यक्त केल्याने त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये उत्साह संचारला आहे. जेष्ठतेचा मुद्दा उपस्थित करून जेष्ठतेचा विचार व्हावा अशी भावनिक साद पक्ष श्रेष्ठीना कार्यकर्त्यांनी केली आहे. नुकतेच बाळासाहेब खेमनर यांनी देखील गावागावात आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. यावेळी माघार नाहीच तर कुस्ती देखील चितपत करणार अशी सिंह गर्जना बाळासाहेब यांनी केली आहे.
एक शांत संयमी व तरुणांमध्ये आज क्रेज बाळासाहेब यांची दिसत आहे. सर्वाशी मैत्रीपूर्ण संबंध त्यामुळे विरोधक देखील त्यांचा मानसन्मान राखत आहेत. लहानग्यांपासून ते वयोवृद्धा पर्यंत बाळासाहेब सर्वांचे लाडके आहेत. आपल्या प्रतिषठेला कधी ही त्यांनी गालबोट लावून दिले नाही त्यामुळे येणारा काळ हा त्यांना विजयाचा गुलाल व प्रचंड संघर्षाचे यश घेऊन येईल असा विश्वास महायुतीच्या एका मोठ्या गटाला वाटत आहे.

बारा बलुतेदार अठरा पगड जातींना सोबत घेऊन चालणारा बहुजनांचा नेता
साकूर गट हा सर्व जाती धर्मात विखूरलेला आहे. सर्व जातीधर्माचे लोक या ठिकाणी गुण्यागोविंदाने नांदत आहेत. किरकोळ घटना वगळता येथे जातीयवादाला कुणीही थारा दिला नाही. दोन्हीही गटाकडून या ठिकाणी जातीवरून कधीच राजकारण झाले नाही आणि येणाऱ्या काळात ही तसें होणार नाही. बाळासाहेब कोंडाजी खेमनर हे सर्वसमावेशक नेतृत्व आहे. त्यांना एक संधी दिली पाहिजे अशी इच्छा सर्व जाती धर्माचे लोक व्यक्त करत आहेत.
स्व. बुवाजी पाटील खेमनर यांची सहानुभूती बाळासाहेबांनाच
भाजपची पठार भागातील बुलंद तोफ म्हणून ज्यांच्याकडे बघितले जात होते ते स्व. बुवाजी पाटील खेमनर व बाळासाहेब खेमनर यांची जोडी सर्वाना सर्वश्रुत आहे. सर्व सामाजिक व राजकीय क्षेत्रात दोघे सोबत दिसत असत. साकूर पठार भागाच्या प्रश्नांबाबत दोघेही अग्रभागी व सोबत असायचे. स्व. बुवाजी पाटील खेमनर यांच्या अचानक जाण्याने महायुती चा एक मोठा गट आजही दुखावटा पाळून आहेत. परंतु याच बुवाजी पाटील खेमनर यांनी बाळासाहेब यांना आपण एक संधी देऊ. यावेळेस त्यांच्यावर गुलाल पडू द्या असे ते जवळील कार्यकर्त्यांना सांगत होते. त्यामुळे स्व. बुवाजी पाटलांच्या इच्छेनुसार बाळासाहेबांनीच उमेदवारी केली पाहिजे अशी इच्छा आता कार्यकर्ते व्यक्त करत आहे.

एक स्वच्छ प्रतिमेचे व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब खेमनर
सध्या अनेक युवा नेते प्रत्येक पार्टीत उदयास येत आहेत. पदासाठी, खुर्चीसाठी, ठेकेदारीसाठी तसेच अवैध धंदे सुरु ठेवण्यासाठी परंतु बाळासाहेब यांनी कधीही पदाची किंवा खुर्चीची लालसा बाळगली नाही. बाकी नेत्यांसारखी पोलीस ठाण्यात बसून नेत्यांना फोन लावून सेटलमेंट चे राजकारण बाळासाहेबांनी केले नाही. दोन समाजात वितुष्ट निर्माण होईल असे कृत्य कधी केले नाही. त्यामुळे बाळासाहेब खेमनर हे कधीही कुणाच्या डोळ्यात खपले नाही. आपली स्वच्छ प्रतिमा त्यांनी कायम साबूत ठेवली. म्हणूनच त्यांना प्रत्येक समाजातून मान सन्मान मिळत आहे.
महायुती कडून बाळासाहेब खेमनर व गुलाब भोसले यांच्यात जबरदस्त रस्सीखेच
बाळासाहेब खेमनर यांच्यासोबत गुलाब भोसले हे देखील महायुती कडून या गटात उमेदवारी साठी दावेदार आहेत. परंतु गुलाब भोसले यांना उमेदवारीसाठी महायुती चा एक गट प्रचंड नाराज आहे. गुलाब भोसले यांच्याकडे जातीयवादाचा आरोप होत आहे. त्यांचे काही महिन्यांपूर्वी झालेले मुस्लिम समाजाबद्दल वक्तव्य त्यांच्यासाठी नुकसान ठरू शकते. तसेच साकूर गटात धनगर समाजासह ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आहे. आणि ओबीसी समाजातील मोठा प्रवर्ग असलेला धनगर समाज हा देखील मोठ्या प्रमाणात गुलाब भोसले यांच्यावर नाराज आहे. अशी चर्चा या गटात सुरु आहे. त्यामुळे गुलाब भोसले यांना या गटातून उमेदवारी महायुतीसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. तसेच गुलाब भोसले भाजप चे तालुका अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी मूळ कार्यकर्ता बाजूला सारून नव्याना संधी दिली. जुना कार्यकर्ता पक्ष संघटनेतून बाजूला सारल्याने जुना व कट्टर कार्यकर्ता गुलाब भोसले यांच्यावर आज नाराज आहे. त्यामुळे महायुती ने गुलाब भोसले यांना उमेदवारी दिल्यास येथे मोठं नुकसान या गटातून होईल असा खेद राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
क्रमशः भाग 1







