तालुक्यातील जनतेन मागील दिवाळीला आ.अमोल खताळ यांना विजयी करून महायुतीला मोठी भेट दिली होती. या वेळची भेट म्हणून शत प्रतिशत करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवायचा आहे असा संकल्प करा असे आवाहन राज्याचे जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
आमदर.अमोल खताळ आणि महायुती च्या वतीने दिपावली स्नेहमिलन आणि दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी थोर विचारवंत प्रा.एस.झेड देशमुख सर, भाजपचे प्रदेश पदाधिकारी सुनील कर्जतकर, शिवसेनेचे जालिंदर भोर, जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, उपजिल्हाप्रमुख मारुती मेंगाळ, जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, राष्ट्रवादीचे जिल्हाप्रमुख कपिल पवार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे, राजेंद्र सोनवणे, शहर प्रमुख दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी, भाजप ज्येष्ठ नेते सुदाम सानप, बापूसाहेब गुळवे, भीमराज चतर, डॉ अशोक इथापे, श्रीराम गणपुले, जावेद जहागिरदार, भाजप शहराध्यक्ष पायल ताजने, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी, डॉ सोमनाथ कानवडे, कैलास वाकचौरे, आर पी आयचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके, शहराध्यक्ष कैलास कासार, शौकत जहागीरदार, हरीश चकोर, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील यांनी संगमनेरी मिसळ आणि जिलेबीचा आस्वाद घेतला तसेच शहर आणि तालुक्यातील दहा ते बारा हजार सगमनेरकरांनी मिसळीचा आस्वाद घेतलामंत्री विखे पाटील म्हणाले की, आमच्या निवडणुका झाल्या आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत गट तट बाजूला ठेवून महायुती जो उमेदवार देईल त्याच्या पाठीमागे उभे राहाण्याचे आवाहन करून तालुक्यामध्ये शत प्रतिशत महायुतीला विजयी करण्याचा संकल्प करून निर्धार करण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.
यावेळी उपस्थिततांचे स्वागत आमदार अमोल खताळ यांनी केले सूत्रसंचालन स्मिता गुणे यांनी करून उपस्थितांचे आभार मानले यावेळी संगमनेर शहर आणि तालुक्यातील महायुतीचे कार्यकर्ते आणि संगमनेरकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी आमदार थोरात यांनी बोगस मतदान नोंदणी केली नसती तर ५० हजाराच्या मताधिक्याने निवडून आलो असतो -आ खाताळ विधानसभेच्या.निवडणुकीत पराभूत झालेल्यांनी एव्हीएमवर आरडा ओरडा सुरू केला होता.आता राज ठाकरेना पुढे करून बोगस मतदान झाल्याचा तालुक्यातील मतदारांवर आरोप करून अपमान केला जात आहे. येथून पुढे जर जनतेचा कोणी अपमान केला तर ते अजिबात सहन केले जाणार नाही. यापुर्वी बोगस मतदान कोणी नोंदवले आणि ते कसे घडविले याची संपूर्ण आकडेवारी काढली असून ती आपण लवकरच जाहीर करणार आहे जर माजी आ बाळासाहेब थोरात यांनी जर बोगस मतदान नोंदणी केली नसती तर आपण ५० हजारांच्या मता धिक्याने निवडून आलो असतो. जसा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मामा टेकावला तसाच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने भाचा सुद्धा टेकवणार आहे.
अमोल खताळ आमदार संगमनेर विधानसभा

दोन भाजप नेते गेल्याने मंत्री विखे यांनी सत्कार केला रद्द दिपावली स्नेहमिलन कार्यक्रमा निमित्त आयोजित कार्यक्रमात राहुरी तालुक्याचे विधान सभा सदस्य आणि अहिल्या नगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन स्व.आमदार.शिवाजीराव कर्डीले तसेच संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकुरचे भाजप नेते स्व.बुवाजी खेमनर यांचे निधन झाले आहे त्यामुळे मंत्री विख यांनी सत्कार रद्द करून या दोन्ही नेत्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली






