मिनी आमदारकी समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठी साठी काल आरक्षण जाहीर झाले आहे. इच्छुकांनी आता कंबर कसली आहे. अनेकांनी तयारी सुरु केली आहे.
संगमनेर तालुक्यातील विशेष महत्वाचे असलेले तळेगाव गटात इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सध्या तळेगाव दिघे गटातील गावांवर महायुतीचे वर्चस्व काही काळापासून दिसत आहे. तसें याआधी येथून काँग्रेस चा उमेदवार निवडून गेलेला आहे. परंतु ती परिस्थिती सध्या राहिलेली नाही. सध्या परिस्थिती बदलली असून अनेक ग्रामपंचायत वर महायुतीचे वर्चस्व आहे. असो येणारी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही दोन्हीही पक्षासाठी अतिशय प्रतिषठेची असणार आहे.

तळेगाव जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे येथे अनेक महिला भगिनी नी इच्छा व्यक्त केली आहे. परंतु वरिष्ठ नेते जातीय राजकारण जुळवून उमेदवार देणार आहेत. जन माणसात उज्वल प्रतिमा असणाऱ्या उमेदवार देण्याचा वरिष्ठाचा विचार असेल. महायुती कडून आ अमोल खताळ यांनी अगोदर च मी आणि जलसंपदा मंत्री विखे पाटील मिळून निर्णय घेऊ असे सांगितले आहे त्यामुळं येणारा काळचं उमेदवार ठरवणार आहे. तळेगाव गटात तळेगाव गण व वडगाव पान गण आहेत. यात पंचायत समिती तळेगाव गण हा सर्वसाधारण व्यक्ती म्हणजेच खुला झालेला आहे. त्यामुळे या गणातून अनेकजण इच्छुक असणार आहे. तर वडगाव पान गणात अनुसूचित जाती साठी आरक्षण लागू झाले आहे. येथून देखील अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.
महायुती कडून प्रकाश सानप, शरद गोर्डे, विठ्ठल घोरपडे, राजाभाऊ सोनवणे, श्रीनाथ थोरात, मयूर दिघे, निळंवंढे सरपंच शशिकला पवार, शिवाजी आहेर उर्फ बाबा पॅटर्न, नवनाथ जोंधळे, हे सर्व इच्छुक आता महिला आरक्षित झाल्याने आपल्या घरातील महिलेला जिल्हा परिषदेसाठी उभे करतात का हे बघणं महत्वाचे ठरणार आहे. तर काँग्रेस तथा महाविकास आघाडी कडून देखील जोरदार तयारी सुरु आहे. योग्य उमेदवार देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांची चाचपणी करत आहे. स्वतः काँग्रेस चे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात या ठिकाणी चाचपणी करत आहेत. महेंद्र गोडगे, बाबासाहेब कांदाळकर, बाळासाहेब गायकवाड, हे या गटातील काँग्रेस चे इच्छुक उमेदवार आहेत. तेव्हा ही निवडणूक प्रतिष्ट्येची ठरणार आहे.

विधानसभेत बाळासाहेब थोरात यांचा पराभव हा या भागातील नाराजी मुळे झाला. तळेगाव गावातून खरी परिवर्तनाची ठिणगी पडली आणि ती संपूर्ण तालुक्यात परिवर्तनचा ज्वाला बनली. तळेगाव ग्रामपंचायत वर मंत्री विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भगवा फडकला आणि थोरात यांना तेव्हाच झटका बसण्यास सुरुवात झाली. म्हणूनच सांगायचं झालं तर तळेगाव ग्रामपंचायत मधून तालुक्यातील परिवर्तनाला सुरुवात झाली.
तळेगाव गटात सध्या महायुती कडे मोठ्या प्रमाणात इच्छुकांची गर्दी आहे. त्यातच भाजपचे प्रकाश सानप यांनी देखील जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती साठी उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ही इच्छा त्यांनी आमच्याशी बोलताना व्यक्त केली आहे.
जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील व तालुक्याचे आमदार अमोल खताळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी या भागात काम करत आहे. त्यामुळे मला संधी भेटू शकते. अनेक महिन्यांपासून मी जिल्हा परिषदेसाठी तयारी करत आहे. त्यामुळे मी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी पूर्ण सज्ज आहे. पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद दोन्हीही जबाबदाऱ्या मी किंवा माझ्या घरातील महिला सांभाळू शकतो. त्यामुळे कुठलीही एक जागा मी निवडणूक लढेल.
प्रकाश सानप (भाजप नेते )







