संगमनेर: संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथील तुकाराम राधुजी लांडगे यांच्या मालकीच्या आठ गाईंना चाऱ्यातून विष बाधा झाली होती. मात्र वेळीच धांदरफळ येथील पशुवैद्यकीय डॉक्टर व स्थानिक पशुवैद्यकीय डॉक्टरांनी त्या गाईंवरती उपचार केले, त्यांना ६ गाईंना वाचविण्यात यश आले आहे. मात्र दोन गाई दगावल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी सौ नीलम खताळ यांनी लांडगे यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वनपर भेट दिली.
संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथील तुकाराम राधुजी लांडगे यांच्या वर अतिशय दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे. त्यांच्या ८ गाईंना चाऱ्यातून विषबाधा झाली होती. वडगाव लांडगा गावचे स्थानिक पशुवैद्यकीय डॉ राहुल जाधव यांनी ही माहिती दिली, धांदरफळ बु।। येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना घटनेची माहिती मिळताच धांदरफळ बुद्रुक पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ सचिन वर्पे व डॉ राजाराम भांगरे यांनी तुकाराम लांडगे यांच्या घरी जाऊन गाईंची तपासणी केली. तेव्हा आठ गाईंना चाऱ्यातून विषबाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले. पशु वैद्यकीय डॉक्टरांनी वेळीच यशस्वी उपचार केला. व त्यातील ६ गाईना वाचविण्यामध्ये पशु वैद्यकीय डॉक्टर आणि अधिकाऱ्यांना यश आले. मात्र यातील २ गाई मात्र दगावल्या आहेत. दुग्धउत्पादक शेतकऱ्याचे सध्या तरी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
यावेळी सुरेश लांडगे तुषार वाकचौरे श्रीकांत वाकचौरे विक्रम लांडगे नवनाथ लांडगे अरुण लांडगे धनराज मालुंजकर गणेश लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथील तुकाराम लांडगे यांच्यामालकीच्या दोन गाई दगावल्या असल्याची माहिती मिळताच आ अमोल खताळ यांच्या पत्नी सौ नीलम खताळ यांनी तुकाराम लांडगे यांच्या घरी जाऊन भेट देत त्यांचे सांत्वन केले आणि लांडगे या शेतकर्यांनाआर्थिक मदत मिळवून घेण्या साठी त्यांना मदत करावी
सौ.नीलमताई खताळ (सामाजिक कार्यकर्त्या)

नीलमताई खताळ यांनी घेतली लांडगे परिवाराची सदिच्छा भेट (छाया: गोरक्ष नेहे)






