खरवंडी (ता. १२) : नेवासा तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी केंद्रस्तरीय विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. केंद्र स्तरावर घेण्यात आलेल्या बालगट व कीलबील गट स्पर्धांमध्ये शाळेच्या विद्यार्थिनींनी प्रथम व तृतीय क्रमांक पटकावून यशाची परंपरा कायम राखली.

बालगट स्पर्धेत वक्तृत्व स्पर्धेत चैताली संभाजी कु-हे यां विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळवून उत्कृष्ट वक्तृत्व कौशल्य सिद्ध केले. तसेच वेशभूषा स्पर्धेत श्रावणी संतोष तांदळे हिने प्रथम क्रमांक पटकावला. याच विद्यार्थिनीने वैयक्तिक गीतगायन स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवत बहुआयामी गुणवत्ता सिद्ध करून दाखवली आहे. किलबिल गट वक्रुत्व स्पर्धेत सिध्दी सुनील तांदळे हिने तृतीय क्रमांक मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले.
या सर्व यशामागे शाळेतील शिक्षक कदम मॅडम व राऊत सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सातत्यपूर्ण मेहनत व विद्यार्थिनींना दिलेले योग्य प्रशिक्षण कारणीभूत ठरले आहे. या विद्यार्थिनींच्या यशाबद्दल पालक, ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







