मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकताच पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसी इथं दौरा केला. तिथं त्यांनी उद्योजकांना त्रास देणाऱ्यांना, खंडणी मागणाऱ्यांना कायद्याने ठोकून काढा, असे निर्देश दिले होते.
याचा प्रत्यय आता यायला सुरवात झाली असून, पहिला दणका अरुण गवळी याच्या अखिल भारतीय कामगार सेनेला बसला आहे. या सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अहिल्यानगर उद्योजकांकडे प्रति महिना एक लाख रुपयांची खंडणी मागण्याचा प्रताप एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला आहे.अखिल भारतीय कामगार सेनेचा सदानंद दयानंद उनवणे ऊर्फ भाऊसाहेब, राजेश पाटील व त्याचे इतर चार साथीदारांविरोधात एमआयडीसी पोलिसांनी(Police)गुन्हा नोंदवला आहे. भाऊसाहेब उनवणे याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून, त्याला न्यायालयाने चार दिवस पोलिस कोठडीत सुनावली आहे.

निंबळक इथल्या एमआयडीसीच्या (MIDC)सुयश मेटल प्रोसिंग्स कंपनीत नऊ फेब्रुवारीला भाऊसाहेब उनवणे आणि त्याचे साथीदारांनी बेकायदेशीरपणे कंपनीत प्रवेश केला. कंपनीचा व्यवस्थापक प्रकाश कोकाटे यांना शिवीगाळ, दमदाटी करून काम बंद करण्यास सांगितले. कंपनीतील काम चालू ठेवायचे असेल, तर दर महिन्याला एक लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा तुला व तुझ्या मालकाला जीवे ठार करू, अशी धमकी दिली.
भाऊसाहेब उनवणे याने कंपनीचा व्यवस्थापक कोकाटे यांच्याकडे लगेच खंडणी मागितली. कोकाटे यांनी विरोध केल्यावर त्याच्याकडून दमदाटी करून, 20 हजार रुपये काढून घेतले. याशिवाय भाऊसाहेब उनवणे व त्याच्या साथीदारांनी सर्व कामगारांना बोलवून त्यांचे अखिल भारतीय कामगार संघटनेस मान्यता देणेबाबत चिथावणी दिली.

उद्योजकांनी मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची करून दिली आठवणएमआयडीसीमधील कंपनीच्या उद्योजकांनी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन, संबंधित गुंडाविरोधात कारवाई करण्याचे निवेदन दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, पारनेर दौऱ्यात केलेल्या, कायद्याने ठोकून काढा, या आदेशाकडे उद्योजकांनी या वेळी लक्ष वेधले.अधीक्षकांच्या आदेशानंतर गुन्हा पोलिस अधीक्षकांनी एमआयडीसी पोलिसांना भाऊसाहेब उनवणे, राजेश पाटील व त्याचे इतर चार साथीदारां विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला.
भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 308(5), 308(4), 329(4), 189(2), 191(2), 190, 325, 351(2), 324(3) प्रमाणे गुन्हा करण्यात आला.भाऊसाहेब उनवणेची गुन्हेगारी पार्श्वभूमीभाऊसाहेब उनवणे याची गुन्हेगारीची पार्श्वभूमी असून, त्याच्याविरोधात तोफखाना आणि कोतवाली पोलिस ठाण्यात प्रत्येकी दोन, असे चार गुन्हे दाखल झाले आहेत. सरकारी कामात अडथळा आणणे, दंगल घडवणे, खून, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, संगनमताने गुन्हे करणे, कट कारस्थान करणे, आर्म अॅक्ट, धमक्या देणे आदी कलमान्वये गुन्ह्याच्या नोंदी आहेत.






