संगमनेर प्रतिनिधी :संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषद गटातील २१ महिला बचत गटांना जनसेवा फाऊंडेशनच्या मार्फत प्रत्येकी एका बचत गटाला ३ लाख ५०हजार रुपये साहित्याची किट. आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ निलम खताळ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. साकूर येथील आशिर्वाद मंगल कार्यालयात बचत गटांना साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी भाजप चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जनसेवा फाऊंडेशनच्या प्रकल्प अधिकारी रूपाली लोंढे, निता कांदळकर आदि मान्यवर उपस्थित होते.

साकूर जिल्हा परिषद गटातील महिला बचत गटांना सक्षम करण्या साठी अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, आमदार अमोल खताळ पाटील यांनी विडा उचलला आहे. तसेच बचत गटांना व्यावसाय उभारण्यासाठी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक बचत गटाला ३ लाख ५० हजार रुपयांच्या साहित्याची किट वाटप करण्यात आली. या किटमध्ये दोन पिठाच्या गिरण्या, दोन इलेक्ट्रॉनिक वजन काटे, पनोलायझर, दोन पॅकिंग मशीनचा समावेश होता. या किटचा महिला बचत गटांना फायदा होणार असल्याचे सौ. खताळ यांनी सांगितले.

यावेळी सर्व महिला बचत गटातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, मोठ्या संख्येने महिला सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्र आणि राज्य सरकार ने महिला सक्षमीकरणासाठी अनेक महत्वकांक्षी योजना आणल्या. असेच महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वकर्तृत्व सिद्ध करण्याची संधी राज्य सरकार व केंद्र सरकार देत आहे.
केंद्र आणि राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून महिला बचत गटांसाठी अनेक योजना आहे त्या योजनांचा महिला बचत गटांनी लाभ घ्यावा . महिलांनी कधीच स्वतःला कमी लेखू नये. तर एकमेकींच्या विचारांची देवाणघेवाण करावी महिलांमध्ये विविध गुण आहे ते गुण आत्मसात करा आणि मिळालेल्या संधीच सोन करा.
सौ. नीलम खताळ सामाजिक कार्यकर्त्या






