विद्या प्रबोधिनी प्रशाला, साकुर येथील दोन विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. इयत्ता १ली मध्ये शिकणारे कुमार अशोकराव इंद्रजीत पाटील खेमनर व इयत्ता ८वी मध्ये शिकणारी कुमारी अदिती अतुल पेंडभाजे या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले. या यशाबद्दल शाळेत विशेष समारंभ आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. भालेकर सर तर अध्यक्षस्थानी रजिस्ट्रार श्री. होळकर सर होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांचे सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती मंदाताई खेमनर, पालक सौ. सोनालीताई खेमनर, सौ. प्राजक्ताताई पेंडभाजे, सौ. पूजाताई खेमनर, प्राचार्या श्रीमती. जमादार मॅडम, मुख्याध्यापक श्री. घुगरकर सर, इन्चार्ज श्री. कोळेकर सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष श्री. इंद्रजीत पाटील खेमनर, उपाध्यक्ष श्री. शंकरराव पाटील खेमनर, सर्व संचालक मंडळ तसेच पालकवर्ग यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले. शाळेच्या वतीने दोन्ही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीस शुभाशिर्वाद देण्यात आले.विद्या प्रबोधिनी प्रशालेचे हे यश सातत्याने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व कौशल्यविकासाच्या संधी देण्याच्या धोरणाचे द्योतक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.







