पारनेर तालुक्यातून खळबळ उडून देणारी बातमी समोर. पोलीस प्रशासनाचा भ्रष्टचाराचा कळस ‘रक्षकच बनलेत भक्षक’
कंपनीतील काम आवरून घरी जाणाऱ्या कामगारांना दरोड्याच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन पोलीस दादाने पैसे उकळले. पैसे घेतल्याची चर्चा होताच पैसे परत… पारनेर पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या पोलीस दादाची करामत.
सविस्तर वृत्त असे की, पारनेर तालुक्यातील करंजी गावातील तरुण सुपा येथील एका कंपनीत हेल्पर म्हणून काम करतात. कंपनीतून काम सुटल्यावर रात्री ते आपल्या गावी येत असताना त्यांना रस्त्यात एका कंटेनर ने कट मारला. कट का मारला याचा जाब या तरुणांनी त्या कंटेनर चालकास विचारला दोघां मध्ये तु तू मै मै झाली. परंतु हा सुरु असलेला प्रकार पारनेर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या देवकर नामक पोलीस दादाने बघितला व मध्यस्थी करून वाद मिटवला. यानंतर मात्र या पोलीस दादाने ड्राइवर च्या गळ्यातील चैन तुम्ही घेतली तुमच्यावर ड्राइवर गुन्हा दाखल करत आहे. तुम्ही लाख भर रुपये द्या अन्यथा दरोड्याचा गुन्हा दाखल करतो अशी धमकी दिली.

या नंतर हे तरुण चांगलेच घाबरले. या पोलीस दादाचा पंटर ला भेटून यांनी 75000 हजार रुपयात तडजोड केली. काही पैसे फोन पे द्वारे देण्यात आले तर काही पैसे मध्यस्था मार्फत रोख स्वरूपात देण्यात आले. पैसे दिल्यानंतर मात्र या तरुणांना कळाले की असा कुठलाही चालक गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात आला नाही. या देवकर नामक पोलिसांनी आपल्याला चुना लावला आहे, हे या तरुणांच्या लक्षात आले. व यांनी काही संबंधित पत्रकारांना कॉल करून आपबीती सांगितली.
आम्हाला ही अशीच माहिती प्राप्त झाल्यावर आम्ही सदर पोलीस दादा देवकर यांना कॉल केला सदर घटना त्यांना सांगितली असता त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की हो मी पैसे घेतले आहे. मी ते पैसे परत त्यांना करतो असे सांगितले. व यानंतर या देवकर नामक पोलीस दादाने ते पैसे या तरुणांना दिले व हे प्रकरण मिटले. परंतु सदर पोलीस दादाने अनेकांना असे लुटल्याची चर्चा आहे. असो या पोलीस दादांना पोलीस प्रशासनात काम करण्याचा अधिकार राहिला आहे का? या अशा पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्यामुळे पोलीस प्रशासन हाकनाक बदनाम आहे. सर्वसामान्य जनता न्याय मागायला जाते व त्यांनाच आरोपी च्या पिंजऱ्यात उभे केले जाते या अशा पोलीस प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे सर्वसामान्य जनता भरडली जाते. व चुपचाप अन्याय सहन करते.

आम्ही पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना ही माहिती दिल्यानंतर त्यांनी सदर कर्मचाऱ्यावर नाराजी व्यक्त केली आहे.सदर पोलिसा विरोधात गृह खात्याने कडक पाऊल उचलून यांना निलंबित केले पाहिजे म्हणजे या अशा भ्रष्ट कारभाराला लगाम लागेल. अन्यथा रक्षकच भक्षक होतील यात कुठलीही शंका नाही.






