साकूर (प्रतिनिधी) – देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसा निमित्त अहिल्यानगर जिल्ह्यात पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा पंधरवडा अभियान सुरु आहे. यानिमित्त संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ पाटील यांच्या सुचनेनुसार आज बुधवार दि.24 सप्टेंबर रोजी संगमनेर तालुक्यातील साकूर मंडलाधिकारी कार्यालय येथे मंडल स्तरावरील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबीर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी शिबीरात येणार्या नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये शेतकर्यांच्या मागणीवरुन महाराष्ट्र शासनाच्या पाणंद रस्ते योजने अंतर्गत थेट जागेवर जाऊन देखील काही रस्त्यांची पाहणी करण्यात आली. या शिबीरामध्ये उत्पन्नाचा दाखला,नाॅन क्रिमिलेयर,अधिवास दाखला, जातीचा दाखला ई.दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
तसेच श्रावणबाळ,संजय गांधी निराधार योजना ई.योजनांसाठी तसेच फेरफार नोंद,वारस नोंद ई. अर्ज स्विकारण्यात आले. यावेळी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख, ज्येष्ठ नेते बुवाजी खेमनर इ.महायुतीच्या पदाधिकार्यांच्या हस्ते विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले तथा योजनांसाठी अर्ज स्विकारण्यात आले.






