अण्णासाहेब लक्ष्मण घुले गेल्या आठ दिवसांपासून घर सोडून परगंदा
संगमनेर तालुक्यातील जांबुत बुद्रुक येथील रहिवासी असलेले अण्णासाहेब लक्ष्मण घुले हे गेल्या आठ दिवसांपासून भावकीच्या जाचाला कंटाळून घर सोडून गेले आहेत. अशी माहिती त्यांचे चिरंजीव आदिनाथ अण्णासाहेब घुले यांनी घारगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. घारगाव पोलीस ठाण्यात अश्या प्रकारची मिसिंग केस दाखल करण्यात आली आहे. सादर तपास हा पोलीस सब इन्स्पेक्टर गांदळे साहेब हे करत आहे.
अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील जांबुत बुद्रुक येथील आदिनाथ अण्णासाहेब घुले यांनी घारगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या मिसिंग केस मध्ये म्हंटले आहे की, माझे वडील अण्णासाहेब लक्ष्मण घुले हे गेल्या आठ दिवसांपासून घर सोडून गेले आहे. यावेळी त्यांनी आपल्या पत्नीला फोन करून सांगितले की मी घर सोडून जात आहे. मी भावकीने केलेल्या केसेस मुळे वैतागून गेलो आहे. भावकीने माझ्या विरोधात छडयंत्र रचले आहे. माझ्या जीवाचे काहीही बरे वाईट करतील त्यामुळे मी घर सोडून जात आहे असे सांगितले. या केसमध्ये दिलेली माहिती असे की, अण्णासाहेब लक्ष्मण घुले वय 45 वर्ष, रंग गोरा उंची 5 फूट सहा इंच असा आहे






