साकूर प्रतिनिधी: प्रजासत्ताक दिना निमित्त विद्याप्रबोधिनी प्रशालेत आज उत्साहपूर्ण व देशभक्तीपूर्ण वातावरणात झेंडावंदनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष इंद्रजीत अशोकराव पाटील खेमनर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यालयाचा देशसेवेत कार्यरत असलेला विद्यार्थी विद्यालयात झेंडावंदन करतो. या परंपरेनुसार यावर्षी भारतीय सैन्यात गलवान येथे कार्यरत असलेले माजी विद्यार्थी गौरव संजय देवगिरे यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते.

गौरव देवगिरे यांनी शाळेच्या प्रांगणात तिरंगा फडकावला आणि सर्व उपस्थितांना देशभक्तीचा संदेश दिला. या निमित्ताने गौरव यांचा तसेच त्यांच्या आई-वडिलांचाही शाळेतर्फे सन्मान करण्यात आला. उपस्थित ग्रामस्थ, पालक आणि शिक्षकांनी त्यांच्या सैनिकी सेवेबद्दल मनापासून कौतुक व्यक्त केले.

आज प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत ‘रंगोत्सव’ हे चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी काढलेली विविध विषयांवरील उत्कृष्ट चित्रे प्रदर्शित करण्यात आली होती. या चित्र प्रदर्शनाला ग्रामस्थ, पालक आणि कला रसिकांनी मोठ्या प्रमाणात भेटी दिल्या. विद्यार्थ्यांच्या कला कौशल्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, प्रदर्शनातील सुमारे १५ उत्कृष्ट चित्रे उपस्थितांनी विकत घेतली. कला रसिकांनी या चित्रांना उत्कृष्ट दाद दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शाळेच्या या देशभक्तीपूर्ण आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, कला आणि सर्जनशीलतेची भावना अधिक दृढ होण्यास मदत झाली आहे. तसेच शासकीय रेखांकन स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. गौरविण्यात आलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे:

घुगरकर अनुपमा सुभाष, तहुरा मोहसिन मोमिन, श्रुतिका दत्तात्रय रंधे, सायमा नाजीम राजे, समृद्धी श्रीकांत लोंढे, प्रिया दादाभाऊ ठाणगे, कार्तिकी श्याम कल्याणकर, आराध्या पंकज भागवत, स्वतिका राहुल तिरवाडी.
रंगोत्वामध्ये बक्षीस मिळवलेले विद्यार्थी लहान गट 1) स्वामिनी सतिष टेकुडे 2) सफा झुबेर शेख 3)श्रेयसी शरद मुंजाळ, मोठा गट 1) श्रुतिका दत्तात्रय रंधे 2) टहुरा मोहसिन मोमिन 3)अनुपमा सुभाष घुगरकर या उपक्रमाचे व विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या विद्यार्थ्यांना कु. अक्षय निवृत्ती डोके सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच निवृत्ती डोके सर व नितीन लोळगे सर यांनी या रंगोत्वाचे परीक्षण केले. विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह ज्ञानदेव डोके यांच्या सौजन्याने देण्यात आले. विद्यालयाच्या वतीने त्यांचाही सत्कार करण्यात आला.







