बंटी जहागिरदार याच्यावर गोळीबाराने अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ,
अस्लम शेख उर्फ बंटी जहागिरदार हा 2012 मधील पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्पोटातील आरोपी,
श्रीरामपूर प्रतिनिधी :दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान कब्रस्तानातील एका अंत्यविधीला उपस्थित राहून बंटी जहागीरदार हा मित्र अमीन हाजी यांच्या दुचाकीवरून घरी जात होता. सेंट लूक हॉस्पिटलच्या ओपीडी गेटजवळ पोहोचताच दबा धरून बसलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी दोन पिस्तुलांमधून त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. यात त्याच्या छातीच्या दोन्ही बाजूंना, पायाला, पाठीला तसेच कानाजवळून गोळी लागली. एकूण सहा गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती आहे.
दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी झाडल्या गोळ्याश्रीरामपूर येथील अस्लम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागिरदार याची हत्या झाली आहे. भर दुपारी अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला होता. या हल्ल्यात बंटी जहागिरदारला गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर जहागिरदारला अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. श्रीरामपूर येथे कब्रस्तानातून बाहेर पडल्यानंतर बंटी जहागिरदारवर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जहागिरदारवर कब्रस्तानातून बाहेर पडत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघा जणांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. अनेकांनी हल्लेखोरांची व्हिडिओ देखील बनवल्याचं दिसत आहे.

गोळीबार झाल्यानंतर परिसरात पळापळ सुरू झाली.एवढ्या मोठ्या प्रकरणातील हायप्रोफाईल आरोपीची अशाप्रकारे हत्या झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोन मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.यात गुरुवारी दोघांना कोपरगाव हद्दीतून अटक करण्यात आली आहे. जिल्हाभर करण्यात आलेल्या कडक नाकाबंदीमुळे आरोपींना पळून जाण्यात अपयश आलं आहे. बंटी जहागीरदारवर गोळीबार झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते.या घटनेचे गांभीर्य ओळखून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली.
अहमदनगर जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यांमध्येही नाकाबंदीचे आदेश देण्यात आले होते. आरोपी रवी निकाळजे आणि कृष्णा शिंगारे हे दोघे कोपरगावमार्गे पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर प्राथमिक चौकशीत दोन्ही आरोपींनी बंटी जहागीरदारची हत्या केल्याची कबुली दिली आहे. मयत बंटी जहागीरदारची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने जुन्या वादातून त्याची हत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत.
गोळीबाराच्या घटनेनंतर श्रीरामपूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान राजकीय तसेच गुन्हेगारी क्षेत्रात बंटी जहागीरदार याचा नाव होतं. त्यामुळे नेमका हल्ला कोणत्या कारणातून झाला हे अद्याप अस्पष्ट झाले नाहीये. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून तेथून काडतुसे गोळा करण्यात आली आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधासाठी पाच टीम रवाना करण्यात आली आहेत.
बंटी जहागिरदार यांच्या हत्येमागील कारणेबंटी जहागिरदार यांच्या हत्येमागील नेमके कारण काय, हे स्पष्टपणे नमूद केलेले नाही, मात्र पोलिसांनी तपास सुरू केला आहे 1. बंटी जहागिरदार हे 2012 च्या पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी होते आणि ते जामिनावर बाहेर होते 1. श्रीरामपूर शहरात त्यांच्यावर दिवसाढवळ्या गोळीबार झाला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला 2. हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला 2. हल्लेखोर दुचाकीवरून आले होते आणि घटनेनंतर ते पळून गेले, त्यामुळे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत







