शिवशाही फाउंडेशन,भारत व निरंजन धारा,लखनऊ यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रेमपाल शर्माजी (IAS) संयुक्त सचिव रेल्वे बोर्ड भारत सरकार यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रसिद्ध संगीतकार पंडित ब्रीज भूषण गोस्वामी जी, आंतरराष्ट्रीय बासरी वादक /NTPC दगम सौरभ बनौधा याचा बासरी वादनाचा कार्यक्रम यावेळी संपन्न झाला. हा कार्यक्रम देशबंधू महाविद्यालय कालकाजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता.
सौरभ बनौधा व सुनिल दक्ष यांच्या बासरी व तबला वादनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. दिवंगत पं. निरंजन प्रसाद यांच्या पुण्यस्थिती निमित्त दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. पंडीत जी 1960 ते 2005 या काळातील सर्वात आदरणीय आंतरराष्ट्रीय बासरीवादक होते. आणि त्यांनी जगभरात आपली बासरी वादन केले. ते राष्ट्रीय वाद्यवृंद समिती चे सदस्य(भारत सरकार) होते. पंडित निरंजन प्रसाद जी यांनीही हिंदी चित्रपट सृष्टीत बासरीवादनाचे काम केले. त्यापैकी काही प्रसिद्ध हिंदी चित्रपट ‘गुड्डी’, ‘शोर’ इ. आहेत.ते आकाशवाणी लखनौ येथे अव्वल दर्जाचे कलाकार म्हणून कार्यरत होते.

बासरीवादन मध्ये सर्वात आदरणीय गुरूंपैकी एक होते. 2013 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी ‘पंडित निरंजन प्रसाद राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार’ हा निरंजनधारा, लखनऊ यांच्या तर्फे दिला जातो. या वर्षी शिवशाही फाउंडेशन,भारत आणि निरंजनधारा,लखनऊ यांच्या संयुक्त विद्यमानाने हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार सामाजिक कार्य, लेखन, प्रशासन, कला आणि संस्कृती, संशोधन अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पाच मान्यवरांना दिला जातो. शिवशाही फाउंडेशन,भारत आणि निरंजन धारा,लखनऊ या संघटना विविध सामाजिक कामे करतात. जसे की, शिक्षण, आरोग्य, आयुर्वेद, योग आणि विकास,पर्यावरण, कला व सांस्कृतिक यांसारख्या क्षेत्रांमध्ये सतत कार्यरत असते.

यावर्षी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पाच मान्यवरांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. या वर्षी म्हणजेच 2025 चे पुरस्कार विजेत्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे:- 1)पं.श्री.अशोककुमार– प्रख्यात संगीततज्ज्ञ, 2) डॉ.मूलचन्द्र सिंह -समाजसेवा, 3) डॉ. संदिप भोसले (IRS) -उपायुक्त ,प्रशासन, 4) डॉ . विशाल वळवी- वैद्यकीय सेवा व आदिवासी न्याय हक्कासाठी लढा, 5) अरूणकुमार मलिक- नाटक व दिग्दर्शन, अशा विविध क्षेत्रातील अमूल्य कामगिरीबद्दल पुरस्कार देण्यात आला. हे पुरस्कार स्वर्गीय पंडित निरंजन प्रसाद जी यांच्या 12 व्या पुण्यतिथीनिमित्त घोषित करण्यात आले.
4 ऑक्टोबर 2025 रोजी देशबंधू महाविद्यालय कालकाजी नवी दिल्ली येथे या भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्याक्रमाचे सूत्रसंचालन लायबा रशिद व भावना यांनी केले. यावेळी देशबंधू महाविद्यालय कालकाजी, नवी दिल्लीचे गुणवंत विध्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पदक देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रेमपाल शर्माजी (IAS) संयुक्त सचिव रेल्वे बोर्ड भारत सरकार व प्रसिद्ध संगीतकार पंडित ब्रीज भूषण गोस्वामी जी, आंतराष्ट्रीय बासरीवादक सौरभ बनौधा, संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष बाळाराम माडकर – शिवशाही फाउंडेशन,भारत, आणि श्रीमती उर्मिला बनौधा संचालक – निरंजन धारा, डॉ.श्रीकारा गौडा- राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवशाही व उद्योजक लखनऊ, मनू माथूर डेप्टी जनरल मॅनेजर,
एन.टी.पी.सी,शिक्षण संस्थाचे प्राचार्य डॉ.राजेद्रकुमार पांडे, NSS विभाग प्रमुख डॉ अजय सिंह गहलोत, खजिनदार प्रतिक कोडूलकर, सचिव ॠतुराज पाटील,योगेश पाटील, शैलेश तेवथिया, नितीन महरौली, विनोद, एडवर्ड जी, सागर डांगर, नवनीत याच्या उपस्थितीत सर्व विजेताना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी PCOX GROUP व डॉ.विजयसिंह उपायुक्त , डॉ.नकुल कोरडे, डॉ अंबादास माडकर, संस्थेचे व्यवस्थापन समितीचे विशेष सहकार्य लाभले…







