पीडितेला ब्लॅकमेल करत अर्धनग्न व्हिडीओ काढले. हेच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार. अहिल्यानगर मधील तोफखाना पोलीस ठाण्यात फरहान सादिक शेख याच्यावर गुन्हा दाखल..

अहिल्यानगर विशेष प्रतिनिधी (एस एस झावरे): अहिल्यानगर शहरात एका 18 वर्षीय तरुणीवर राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील फरहान सादिक शेख या तरुणाने फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. वाढत्या धमकीला व अत्याचाराला कंटाळून तरुणीने अखेर झालेला प्रकार आपल्या आईला सांगितला. यावर आईने मुलीला घेऊन तोफखाना पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला आहे. तोफखाना पोलिसांनी या जिहादी मानसिकतेच्या तरुणाला तात्काळ अटक केली आहे. यावेळी काही हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या.

सविस्तर वृत्त असे की, अहिल्यानगर तालुक्यातील एका गावातील तरुणी नगर शहरातील एका नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. तिच्याच वर्गात शिक्षण घेत असलेला राहुरी तालुक्यातील वांबोरी गावातील फरहान शेख याच्यासोबत ओळख झाली. मागील सहा महिन्यापूर्वी तरुणीची या फरहान सोबत मैत्री झाली. मैत्रीत एकदा फरहान याने सेल्फी फोटो काढला. आणि हा फोटो आई वडिलांना दाखवेल अशी धमकी देत पीडितेला डोंगरगण गावाच्या हद्दीत एका डोंगराच्या पायथ्याला एका गार्डन मध्ये 2 मार्च 2026 रोजी जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला.

असाच प्रकार या फरहान ने पुन्हा 18 मार्च रोजी याच जागेवर केला. यानंतर 15 जुलै रोजी फरहान याने पीडिता तीच्या घरी असताना पीडितेला पुन्हा कॉल केला व मला तुझी खूप आठवण येते मला तुला भेटायचे आहे असा तगादा लावला. यावर पिडीत तरुणीने मी घरी असल्याने भेट शक्य नाही असे सांगितले. यावर फरहान याने मुलीला पुन्हा ब्लॅकमेल करून स्नॅप चॅट द्वारे अर्धनग्न व्हिडीओ पाठवण्यास भाग पाडले. यावेळी याच व्हिडीओ चा गैर फायदा घेत फरहानने पीडितेला आणखी त्रास देण्यास सुरुवात केली.
तरुणी 21 जुलै रोजी सकाळी कॉलेज ला गेली असता तेथे सकाळीच फरहान येऊन पीडितेला धमकवू लागला. अर्धनग्न व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी यावेळी तरुणीला या फरहान ने दिली. यावेळी संतापलेल्या तरुणीने थेट घरी जाऊन झाला प्रकार आपल्या आईला सांगितला. आईने थेट तोफखाना पोलिस ठाणे गाठत आरोपी फरहान सादिक शेख रा. वांबोरी ता. राहुरी, जि. अहिल्यानगर याच्यावर अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 351(2) व 64(2)(m) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आता तोफखाना पोलीस करत आहे.






